Asia Cup 2022 IND vs AFG : ही सर्वात इंटरेस्टिंग मॅच? भन्नाट मीम्स पाहून खळखळून हसाल!

WhatsApp Group

Asia Cup 2022 IND vs AFG : आशिया कप २०२२ स्पर्धेमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान संघात औपचारिक सामना खेळवला जातोय. दोन्ही संघ आधीच स्पर्धेबाहेर झाले आहेत. शर्मा हा सामना खेळत नसल्यानं केएल राहुल या सामन्याचं नेतृत्व करत आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ सुपर-४ मधील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावून अंतिम शर्यतीतून बाहेर पडले आहेत. ११ सप्टेंबर रोजी याच मैदानावर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार आहे. अशा स्थितीत भारत आणि अफगाणिस्तानच्या नजरा या फेरीतील पहिल्या विजयावर आहेत.

राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं सामन्यात दोन बदल केले आहेत. दुसरीकडे, अफगाणिस्तान संघानं कोणताही बदल केलेला नाही. अखेरच्या सामन्यात अफगाणिस्ताननं पाकिस्तानला कडवी टक्कर दिली. या सामन्यात रोहित, पंड्या आणि चहल खेळत नाहीत. त्याच्या जागी कार्तिक, अक्षर आणि दीपक चहरला संधी मिळाली आहे. या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मजा लुटली आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा नाही. त्यामुळे मजेशीर मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Asia Cup 2022 : पाकिस्तानच्या विजयानंतर चाहत्यांनी खाल्ला मार..! अफगाण लोकांनी चोपलं; VIDEO व्हायरल!

भारताला सुपर-४च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि पुन्हा श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. याआधी या संघानं गट फेरीतील दोन्ही सामने जिंकले होते. त्याचबरोबर अफगाणिस्ताननंही गट फेरीत बांगलादेश आणि श्रीलंकेचा पराभव केला. या स्पर्धेचा हा १५वा मोसम आहे. भारताने सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावलंआहे. मात्र चालू हंगामात संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. श्रीलंकेनं ५ वेळा तर पाकिस्तानने २ वेळा विजेतेपद पटकावलं आहे.

हेही वाचा की – Asia Cup 2022 : पाकिस्तानच्या बॅट्समनचा रडीचा डाव..! आऊट झाल्यानंतर बॉलरवर उचलली बॅट; पाहा VIDEO

दोन्ही संघांची Playing 11

भारत : केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, अक्षर पटेल, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

अफगाणिस्तान : हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जद्रान, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनात, राशिद खान, अजमातुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, फझलहक फारुकी.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment