Video : ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगवर फेकली द्राक्षे, लाइव्ह मॅचमधील घटना!

WhatsApp Group

Ricky Ponting : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी ओव्हलवर खेळली जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच दिवशी इंग्लंडला 283 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 1 गडी गमावून 61 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगसोबत अशी घटना घडली, ज्यावर तो संतापला. पाँटिंग स्काय स्पोर्ट्स समालोचन पॅनेलवर आहे आणि स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांपैकी एकाने त्याच्यावर द्राक्षे फेकलीय. मग काय पाँटिंगचा पारा चढला.

रिकी पाँटिंगला चाहत्यांचे हे वागणे अजिबात आवडले कॉमेंट्रीदरम्यान पाँटिंगच्या शूजजवळ काही द्राक्षे पडताना दिसत आहेत. ही घटना घडली तेव्हा पाँटिंग आणि इयान वॉर्ड दिवसाच्या खेळाबद्दल बोलत होते. याआधी या दोघांनी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू टॉड मर्फीशी संवाद साधला होता.

हेही वाचा – PM Kisan Yojana : तुम्हाला 14व्या हप्त्याचे पैसे मिळाले? चेक करा कारण, तेही ऑनलाइन!

पाँटिंग खूपच संतप्त दिसला आणि त्याने अधिकाऱ्यांना गर्दीतून हे कोणी केले हे शोधण्याची विनंती केली. लाइव्ह शो दरम्यान पॉन्टिंग म्हणाला, “माझ्यावर नुकतीच द्राक्षे फेकली गेली आहेत. हे कोणी केले हे शोधण्यात मला काहीही त्रास होणार नाही.”

रिकी पाँटिंगने या अॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंड संघावर रणनीतीबाबत अनेकदा टीका केली आहे. याच कारणामुळे तो अनेकवेळा इंग्लिश चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment