Video : मार्क वुडचा झंझावात! 155 किमी वेगाने गोलंदाजी; ख्वाजाच्या उडवल्या दांड्या!

WhatsApp Group

Mark Wood Spell : अॅशेसच्या (Ashes) तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. जेम्स अँडरसनच्या जागी वेगवान गोलंदाज मार्क वुडचे पुनरागमन झाले आहे. वुडची गणना सध्या जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये इंग्लंडला याच वेगवान गोलंदाजाची उणीव भासत होती. तब्बल 8 महिन्यांनंतर कसोटी खेळणाऱ्या वुडने येताच आपला वेग दाखवला. त्याच्या पहिल्याच षटकात त्याने सर्व चेंडू ताशी 90 मैल वेगाने टाकले.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा मार्क वुडच्या वेगापुढे निष्प्रभ ठरला. पहिल्या षटकात सतत 90 मैल वेगाने गोलंदाजी करूनही मार्क वुड थांबला नाही. त्याच्या दुसऱ्या षटकात त्याने 96.5 मैलांच्या वेगाने म्हणजेच सुमारे 155 किमी प्रति तास या वेगाने चेंडू टाकला. वुडने त्याच वेगाने गोलंदाजी सुरू ठेवली.

तिसऱ्या षटकातही वुडचा वेग 90 mph च्या खाली आला नाही. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू वुडने टाकला. त्याचा वेग ताशी 152 किमी होता. हा चेंडू पडल्यानंतर आत आला. ख्वाजाला काही समजण्याआधीच चेंडूने विकेट घेतली.

हेही वाचा – World Cup 2023 : ‘हे’ 10 संघ वर्ल्डकपसाठी सज्ज! भारतासाठी धोकादायक कोण? वाचा!

मार्क वुडने आपल्या पहिल्याच षटकात विक्रम केला. लीड्सच्या मैदानावर त्याने सर्वात वेगवान षटक टाकले. त्याचा पहिला चेंडू 91, दुसरा 93, तिसरा 95, चौथा 93, पाचवा 94 आणि सहावा 93 mph होता. मार्क वुडने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये 4 षटके टाकली आणि अवघ्या दोन धावांत एक विकेट घेतली.

त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये वुडची सरासरी 92.9 मैल प्रति तास होती. 2006 नंतर इंग्लंडमध्ये टाकलेला हा दुसरा वेगवान स्पेल आहे. सर्वात वेगवान स्पेलचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. 2021 मध्ये, वुडने लॉर्ड्स कसोटीत सरासरी 93.41 mph वेगाने स्पेल टाकला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment