Ashes 2023 : असं कोण OUT होतं? इंग्लंडचा बॅट्समन ठरला अनलकी; पाहा Video

WhatsApp Group

Ashes 2023 Harry Brook Freaky Dismissal : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंडविरुद्ध (ENG vs AUS) अॅशेसच्या पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा अर्धा संघ अवघ्या 176 धावांत पॅव्हेलियनमध्ये परतवला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडची अवस्था पातळ खराब केली. त्याचवेळी इंग्लंडच्या फलंदाजांच्या दुर्दैवाने यजमान संघालाही बॅकफूटवर ढकलले. हॅरी ब्रूक विचित्र पद्धतीने बाद झाला.

इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक 32 धावा करून नॅथन लायनच्या गोलंदाजीवर बाद झाला. ब्रूकने अवघ्या 37 चेंडूत या 32 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार मारले. 38व्या षटकाच्या नॅथन लायनने टाकले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडू हॅरी ब्रूकच्या थायपॅडला लागून स्टम्पवर गेला.

हेही वाचा – ‘ही’ कंपनी आणतेय भविष्यातील कार! लूक पाहून तोंडात बोटं घालाल

ब्रुकच्या थायपॅडला लागलेला चेंडू इतका उंचावर गेला की ब्रूकला तो कोणत्या दिशेला आहे हे कळलेच नाही. यष्टीरक्षक अॅलेक्स हॅरीनेही आकाशाकडे पाहण्यास सुरुवात केली. चेंडू कुठे गेला हेही त्याने पाहिले नाही. अचानक चेंडू वरून खाली आला आणि ब्रूकच्या हाताला धडकला आणि स्टम्पला लागला. ब्रूक निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment