#ArrestKohli Trends : भारतात क्रिकेटसाठी चाहते कोणत्याही थराला जातात. तामिळनाडूमध्ये अवघ्या २१ वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात चांगला क्रिकेटर कोण यावरून दोघांमध्ये वाद झाला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेत क्रिकेट चाहता एस धर्मराजा, ज्यांच्यावर पी विघ्नेशच्या हत्येचा आरोप आहे आणि ते दोघेही अरियालूर जिल्ह्यातील पोयुर गावातील रहिवासी आहेत.
या घटनेनंतर सोशल मीडियावर #ArrestKohli ट्रेंड करत आहे. शनिवारी सकाळपासून या हॅशटॅगने सातत्याने ट्वीट केले जात आहेत. यामध्ये विराट कोहलीच्या फॅन्सचे जुने ट्वीटही व्हायरल होत आहेत.’
हेही वाचा – Video : ठाण्यात रिक्षाचालकानं मुलीला ५०० मीटर फरफटत नेलं; CCTV मध्ये घटना कैद
Everyone is quite just bcoz he was fan of Rohit Sharma
We Want Justice Modi Ji 💔#ArrestKohli pic.twitter.com/seGvRlQka7
— Harshit 🐬 (@its_monk45) October 14, 2022
Virat is always abusive and aggressive towards the players.That's what his fans learn from him and his criminal fan literally took an innocent life,& shameless people are making this incident as meme material,Virat should be behind the bar asap.#ArrestKohli #JusticeForVignesh pic.twitter.com/Q6m3IVv1j8
— Jyran⚘ (@Jyran45) October 15, 2022
In India I'm virat kholi fan
Love from 🇵🇰 & ppl who wants to #ArrestKohli
Here it is for u pic.twitter.com/hya1aUUxTy— lmran khan (@Imrankhan_45) October 15, 2022
Dear Virat Kohli , I request you to take care of your safety as the next target of your fans may be none other than you . #ArrestKohli #RohitSharma𓃵 pic.twitter.com/kXTxI0I8Kj
— कलम से क्रांति (@SauravK26437107) October 15, 2022
People who are tweeting to arrest koch#ArrestKohli pic.twitter.com/bKpNCPVTZJ
— Divyansh Shukla (@Divyans52615401) October 15, 2022
#ArrestKohli It's not Virat Kohli's fault .🥺🙏 pic.twitter.com/mDbxUO9tbo
— Aman Hrithikians #VedhaArmy♥️ (@hrithik_aman) October 15, 2022
पोलीस काय म्हणाले?
दोघांनी दारू प्राशन केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. केलापासूर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार विघ्नेश इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्सला सपोर्ट करत होता. तर धर्मराज हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) समर्थक आहे. त्यांच्या चर्चेदरम्यान विघ्नेशने आरसीबी आणि विराट कोहलीची खिल्ली उडवली होती. यावर धर्मराज संतापला आणि त्याने विघ्नेशची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री मल्लूर औद्योगिक वसाहतीजवळ घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाणाऱ्या कारागिरांनी विघ्नेशचा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली.