अर्जुन तेंडुलकरची भारतीय संघात एन्ट्री? BCCI ने दिली सुवर्णसंधी!

WhatsApp Group

Arjun Tendulkar Picked For NCA Camp : भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन आता हळूहळू प्रगती करत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याला इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधीही मिळाली. आता इमर्जिंग आशिया चषकापूर्वी BCCI ने अर्जुनची बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये विशेष शिबिरासाठी प्रशिक्षणासाठी निवड केली आहे.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनवर सर्वांची नजर असते. रणजी आणि नंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता तो टीम इंडियात प्रवेश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याची मेहनत फळाला येताना दिसत आहे. निवडकर्त्यांनी इमर्जिंग आशिया चषकापूर्वी विशेष शिबिरासाठी अर्जुनची निवड केली आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष शिव सुंदर दास यांनी 20 अष्टपैलू खेळाडूंची निवड केल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व खेळाडूंना त्यांच्या क्षमता आणि कौशल्यामुळे शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. हे सर्व खेळाडू बंगळुरू येथील एनसीए येथे तीन आठवड्यांच्या विशेष प्रशिक्षण शिबिरात सहभागी होतील.

हेही वाचा – VIDEO : पान मसालाची जाहिरात करणाऱ्या क्रिकेटपटूंवर गंभीरची सडकून टीका!

नाव न सांगण्याच्या अटीवर, बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, इमर्जिंग आशिया कप (23 वर्षांखालील) यावर्षी होणार आहे आणि त्यासाठी बीसीसीआय प्रतिभावान युवा खेळाडूंचा शोध घेत आहे. अष्टपैलू शिबिराची कल्पना एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांची सर्व फॉरमॅटसाठी प्रतिभावान खेळाडूंना बाहेर काढण्याची होती.

एनसीए कॅम्पमध्ये येणारे सर्व खेळाडू खरे अष्टपैलू नाहीत. एक अष्टपैलू खेळाडू आहे जो गोलंदाजीपेक्षा चांगली फलंदाजी करतो आणि गोलंदाजी करणारा अष्टपैलू म्हणजे ज्याची गोलंदाजी चांगली आहे. त्या सर्व खेळाडूंची ओळख करून त्यांना पुढे जाण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार करणे ही या शिबिरामागील संकल्पना आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment