Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचं नशीब फळफळलं! अचानक ‘या’ संघात मिळाली जागा

WhatsApp Group

Arjun Tendulkar : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे नशीब फळफळले आहे. देवधर ट्रॉफी स्पर्धेत दक्षिण विभागीय संघात त्याला जागा मिळाली आहे. ही स्पर्धा 24 जुलैपासून पुद्दुचेरी येथे होणार आहे. 13 ते 23 जुलै दरम्यान कोलंबोमध्ये इमर्जिंग आशिया कपमध्ये खेळणाऱ्या बी साई सुदर्शनलाही स्टँडबाय लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे.

डावखुरा वेगवान गोलंदाज आणि खालच्या फळीतील फलंदाज अर्जुन तेंडुलकरने इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले. भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला ऑगस्टमध्ये उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडूंच्या शिबिरातही स्थान दिले होते. अर्जुनशिवाय कर्नाटकच्या विद्वत कावरपा आणि विजयकुमार विशक आणि व्ही कौशिक यांना दक्षिण विभागाच्या वेगवान गोलंदाजीत स्थान मिळाले आहे.

हेही वाचा – GST Council Meet 2023 : थेटरमधील खाद्यपदार्थ स्वस्त, 18 टक्क्यांऐवजी ‘इतका’ जीएसटी लागणार!

अर्जुन तेंडुलकर वयाच्या 8 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. अर्जुनने त्याचा पहिला सामना 22 जानेवारी 2010 रोजी पुण्यातील 13 वर्षांखालील स्पर्धेत खेळला. अर्जुनने त्याचा पहिला राष्ट्रीय स्तरावरील सामना जानेवारी 2011 मध्ये पुण्यातील कॅडेन्स ट्रॉफी स्पर्धेत होता. नोव्हेंबर 2011 मध्ये त्याने जमनाबाई नरसी स्कूल विरुद्ध धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलकडून 22 धावांत 8 बळी घेतले आणि नरसी स्कूलचा पराभव करून सामना जिंकला.

भारतीय प्रणालीमध्ये, एखाद्या खेळाडूला राज्य संघासाठी त्याच्या कामगिरीच्या आधारे प्रादेशिक संघात स्थान मिळते. अर्जुन देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. आणि गेल्या मोसमात, अर्जुनने गोव्यासाठी 7 सामने खेळले आणि 72 षटकात 4 मेडन्स राखून 8 विकेट घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रन रेट 4.98 होता.

संघ –

मयंक अग्रवाल (कर्णधार), रोहन कुनुमल, एन जगदीसन, रोहित रायुडू, केबी अरुण कार्तिक, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, वॉशिंग्टन सुंदर, विद्वत कावेरापा, विजयकुमार विशाक, कौशिक व्ही, रोहित रेडकर, सिजोमन जोसेफ, अर्जुन तेंडुलकर आणि बी साई किशोर.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment