अँड्र्यू फ्लिंटॉफचं पोरगं लय पुढे जाणार! वयाच्या 16व्या वर्षी रचला विक्रम

WhatsApp Group

Rocky Flintoff : इंग्लंड अंडर-19 आणि श्रीलंका अंडर-19 संघ यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. रॉकी फ्लिंटॉफने दुसऱ्या कसोटीत विक्रमी कामगिरी केली आणि चेल्टेनहॅम येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या युवा पुरुष कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने आपले वर्चस्व कायम राखले. रॉकी फ्लिंटॉफ हा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा आहे. ज्याने या सामन्यात नवा विक्रम रचला. इंग्लंड अंडर-19 संघाकडून अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

अँड्र्यू फ्लिंटॉफच्या उपस्थितीत, 16 वर्षीय रॉकी फ्लिंटॉफ इंग्लंड अंडर-19 साठी शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने 106 धावांची शानदार खेळी केली आणि पहिल्या डावात 324 धावांची आघाडी घेतली. फ्लिंटॉफने आपल्या डावात 181 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने नऊ चौकार आणि दोन षटकार मारले आणि जॅक कार्नेसह सहाव्या विकेटसाठी 78 धावा जोडल्या. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात श्रीलंकेच्या 153 धावांचा टप्पा पार केला.

हेही वाचा –Oh My God…! टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं असं, इंग्लंडचा वर्ल्ड रेकॉर्ड!

अँड्र्यू फ्लिंटॉफ

तुम्हा सर्वांना 2007 चा टी-20 वर्ल्ड कप आठवत असेल, इंग्लंड आणि भारत यांच्यातील मॅचमध्ये अँड्र्यू फ्लिंटॉफने युवराज सिंगला असे काही म्हटले होते की, त्यानंतर त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये 6 षटकार मारून इतिहास रचला होता. फ्लिंटॉफनेच युवराज सिंगला सामन्यादरम्यान डिवचले होते. अँड्र्यू फ्लिंटॉफने इंग्लंडकडून 227 सामन्यात 400 विकेट घेतल्या आहेत. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 7 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. या काळात त्याने इंग्लंडकडून 79 कसोटी, 141 एकदिवसीय आणि 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment