IND vs ENG Semifinal : “हरण्याच्या पद्धतीवरून…”, भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर आनंद महिंद्राही नाराज!

WhatsApp Group

Anand Mahindra On IND vs ENG Semifinal : टीम इंडियाचे टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताला १० गड्यांनी धूळ चारली. या पराभवानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ताशेरे ओढले जात आहे. आता उद्योगपती आनंद महिंद्रांनीही एक ट्वीट करत भारताच्या पराभवावर नाराजी व्यक्त केली. सोबत पुढच्या उपक्रमांसाठी शुभेच्छाही दिल्या.

काय म्हणाले महिंद्रा?

आनंद महिंद्रा म्हणाले, ”हरल्याचे दु:ख नाही, पण हरण्याच्या पद्धतीवरून आहे. खेळाचे बदलणारे वारे क्रुर असू शकतात. असो आम्ही याकडे उगवण्याची आणखी एक संधी म्हणून पाहू…” भारताला २००७ नंतर टी-२० वर्ल्डकप स्पर्धा जिंकता आलेली नाही. मागच्या वर्षी भारत गट साखळीतूनच बाहेर पडला.

हेही वाचा – IND Vs ENG Semifinal : इंग्लंड दिमाखात फायनलमध्ये..! टीम इंडियाची धू-धू-धुलाई

या सामन्यात इंग्लंडचा कप्तान जोस बटलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कप्तान रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, केएल राहुल या भारतीय फलंदाजांना अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. विराट कोहली पुन्हा तारणहार ठरला. त्याला हार्दिक पंड्याची सुंदर साथ लाभली. दोघांनी अर्धशतक ठोकले. भारताने इंग्लंडला १६९ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात इंग्लंडचे सरलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी दे-दणादण फलंदाजी करत १६ षटकात १७० धावा करत विजय मिळवून दिला. या दोघांसमोर भारतीय गोलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. बटलरने ९ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ८० तर हेल्सने ४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ८६ धावा केल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment