Ajit Agarkar Chief Selector : टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतरही हे पद रिक्तच आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आता हे पद भरण्याची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या वृत्तानुसार, भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागला चीफ सिलेक्टर बनवण्याची चर्चा होती. पण नवीन रिपोर्ट्सनुसार, तो वीरेंद्र सेहवाग नसून टीम इंडियाचा माजी गोलंदाज आहे जो चीफ सिलेक्टर होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
टीम इंडियाच्या चीफ सिलेक्टरच्या शर्यतीत अजित आगरकरचे नाव आघाडीवर आहे. क्रीडा क्षेत्रातील एका अहवालानुसार, अजित आगरकर बीसीसीआयचा चीफ सिलेक्टर होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. बीसीसीआयमध्ये चीफ सिलेक्टरचे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असले तरी बोर्ड लवकरच ही जागा भरू शकेल. अजित आगरकरने यापूर्वी मुंबईसाठी सिलेक्टर म्हणून काम केले आहे.
Ajit Agarkar is set to become Team India's new chief selector. (To Indian Express) pic.twitter.com/q7B6cfvcvw
— CricketMAN2 (@ImTanujSingh) June 30, 2023
पात्रता काय असावी लागते?
चीफ सिलेक्टर म्हणून, अर्जदाराला भारतासाठी किमान 7 कसोटी सामने किंवा 30 प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव असावा. याशिवाय अर्जदाराने किमान पाच वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असावी. अशा स्थितीत अजित आगरकरकडे या दोन्ही पात्रता आहेत.
हेही वाचा – Kim Jong Un : उत्तर कोरियात ‘I Love You’ म्हटल्यावर मिळू शकतो मृत्यूदंड!
तो लवकरच बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद भूषवू शकतो. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 16 सप्टेंबर 2007 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. एवढेच नाही तर 2007 साली जेव्हा भारताने टी-20 विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी तो याच विश्वविजेत्याचा भाग होता.
BCCI is set to increase the salary of the chief selector, the current salary is 1 crore.
Ajit Agarkar is set to become the new chief selector of the Indian Team. [The Indian Express] pic.twitter.com/EMTz3lQJdM
— Johns. (@CricCrazyJohns) June 30, 2023
अजित आगरकर हा त्याच्या काळातील सर्वात घातक गोलंदाज मानला जात होता. त्याने टीम इंडियासाठी 26 कसोटी सामने खेळले असून 58 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. यादरम्यान आगरकरने 47.33 च्या सरासरीने आणि 3.39 च्या इकॉनॉमी रेटने 2745 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने भारतासाठी 191 एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 5.07 च्या इकॉनॉमी रेटने 288 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 4 टी-20 सामन्यात 3 फलंदाजांना आपले बळी बनवले आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!