Ajinkya Rahane Sends Yashasvi Jaiswal Off The Field : दुलीप ट्रॉफी २०२२ च्या अंतिम सामन्यादरम्यान अजिंक्य रहाणेनं आपल्याच संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालला मैदानाबाहेर पाठवले. २० वर्षीय जयस्वाल प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांसोबत सारखा स्लेजिंग करत होता. रहाणेने आधी त्याला समजावून सांगितले. पण, जयस्वाल राजी न झाल्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. कोईम्बतूर येथे वेस्ट झोन आणि साऊथ झोन यांच्यात पाच दिवसीय सामना खेळला गेला. वेस्ट झोनने रविवारी २९४ धावांनी विजय मिळवला. त्यांचे हे १९ वे विजेतेपद आहे. तो स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद मिळवणारा संघ बनला आहे. सर्वाधिक विजेतेपदांच्या बाबतीत वेस्ट झोनने नॉर्थ झोनला मागे टाकले. या विजयाचा हिरोही यशस्वी जयस्वाल होता. त्याने वेस्ट झोनच्या दुसऱ्या डावात द्विशतक (२६५) केले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अंतिम सामन्यादरम्यान यशस्वी साऊथ झोनचा फलंदाज रवी तेजासोबत सतत स्लेजिंग करत होता. अशा स्थितीत मैदानावरील पंचांनी जयस्वाल यांना तसे न करण्याचा इशारा दिला. या प्रकरणात कर्णधार रहाणेला हस्तक्षेप करावा लागला. रहाणेने यशस्वीला शांत राहण्यास आणि मैदानावरील शिस्त राखण्यास सांगितले. रहानेही तेजाशी बोलला. त्यानंतर हे प्रकरण मिटले. त्यानंतर ५७व्या षटकात अंपायरला पुन्हा यशस्वी स्लेजिंग करताना दिसला. त्याने रहाणेला बोलावले. यानंतर रहाणेने जैस्वालला मैदान सोडण्यास सांगितले. यशस्वीच्या जागी सत्यजित बच्छावला पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आणण्यात आले. मात्र, ६५व्या षटकात त्याला माघारी बोलावण्यात आले.
हेही वाचा – Navaratri 2022 : महिलांचा स्विमिंग पूलमध्ये गरबा डान्स..! VIDEO व्हायरल
कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्याच संघातील यशस्वी जयस्वालला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले आहे.
यशस्वी व फलंदाज रवी तेजा यांच्या दरम्यान शाब्दिक चकमक होत होती,व यशस्वीला याबद्दल 2 ते 3 वेळा रोखण्यात आले होते.
ऐतिहासिक क्षण…..
#WZvSZ #DuleepTrophy #Rahanepic.twitter.com/DseV7tSwYj
— एक क्रिकेटवेडा (@onlyforcricket0) September 25, 2022
💯 Double-century for Yashasvi Jaiswal, century for Sarfaraz Khan
👏 Four-fors for Shams Mulani, Jaydev UnadkatLed by captain Ajinkya Rahane, West Zone have won the Duleep Trophy 🏆
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 25, 2022
सामना संपल्यानंतर रहाणे म्हणाला, ”काहीही झाले तरी तुम्हाला सामन्याचे अधिकारी, पंच आणि प्रतिस्पर्ध्याच्या खेळाडूंचा आदर केला पाहिजे. क्रिकेट असेच खेळले पाहिजे. काही परिस्थिती विशिष्ट पद्धतीने हाताळल्या जातात. अशा प्रकारे परिस्थिती हाताळता आली असती. मला वाटतं ते बरोबर होते. यशस्वी म्हणाली, ”अज्जू भाई (अजिंक्य रहाणे) जे काही बोलतो ते मी गांभीर्याने घेतो आणि त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करतो.”