Asaduddin Owaisi On IND vs PAK Match In T20 World Cup 2022 : टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये रविवारी मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारत-पाक सामन्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, एकीकडे आम्ही पाकिस्तानात जात नाही आणि दुसरीकडे पाकिस्तानशी सामने खेळतो. एका सभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले, ”हे लोक जेवढे पाकिस्तानचे नाव घेतात, तेवढे आम्ही आयुष्यभर घेत नाही.
पाकिस्तान विरुद्ध सामना का खेळवला जात आहे? ओवेसी यांनी खिल्ली उडवली की, “आम्ही पाकिस्तानला जाणार नाही, तर ऑस्ट्रेलियात पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू… पाकिस्तानसोबत सामना खेळला नाही तर? टीव्हीचे १०००-२००० कोटींचे नुकसान होईल… तुम्ही खेळू नका. मॅच भारतापेक्षा मोठी आहे का?”
“भारताने जिंकावे अशी आमची इच्छा आहे”
ओवेसी पुढे म्हणाले, उद्या भारताने जिंकावे अशी आमची इच्छा आहे. मोहम्मद शमी आणि आमचा मुलगा मोहम्मद सिराज यांनी पाकिस्तानला हरवावे अशी आमची इच्छा आहे. पण ते जर भारत जिंकला तर झिंदाबाद आणि हरले तर ते कसे हरले हे शोधतात. त्यांना हिजाबच्या समस्या आहेत, दाढीच्या समस्या आहेत, क्रिकेट सामन्यांच्या समस्या आहेत… पण लक्षात ठेवा आपले अस्तित्व नाहीसे होणार नाही.”
हेही वाचा – T20 World Cup 2022 : पाकिस्तानी रिपोर्टरचा हिटमॅनला ‘असा’ सवाल..! रोहितचं उत्तर ऐकून सारे अवाक्
असदुद्दीन ओवैसी की क्रिकेट पर सियासत, Ind vs Pak पर क्यों उठाए सवाल? #AsaduddinOwaisi #AIMIM #T20WC2022 @Payodhi_Shashi pic.twitter.com/mtsluboUcd
— Zee News (@ZeeNews) October 22, 2022
भारत-पाकिस्तान संघ २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) दुपारी दीड वाजता आमनेसामने येतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषकातील हा सातवा सामना असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी पावसाची शक्यता आहे. पाऊस पडल्यास षटकेही कमी केली जातील.