दोस्त असावा तर धोनीसारखा..! बॅटवर ‘प्राइम स्पोर्ट्स’ दुकानाचं नाव, आठवलं का?

WhatsApp Group

महेंद्रसिंह धोनीकडून मैत्री जपायला शिकायला हवं. धोनीचे काही मित्र आहेत ज्यांनी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला खूप साथ दिली. या मित्रांपैकी एक म्हणजे परमजीत सिंग. जर तुम्ही एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा सुपरहिट चित्रपट पाहिला असेल, तर तुम्हाला धोनीचा एक शीख मित्र आठवत असेल, जो झारखंडच्या रांची येथील एका छोट्या स्पोर्ट्स सप्लाय स्टोअरचा मालक होता, ज्याने धोनीला त्याची पहिली स्पोर्ट्स स्पॉन्सरशिप मिळविण्यात मदत केली होती.

आता परमजीत सिंगला धोनी अशी भेट देईल, असे कदाचित त्याच्या मित्रालाही वाटले नसेल. अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये धोनी आगामी आयपीएल 2024 साठी सराव करताना दिसत आहे. यावेळी तो प्राइम स्पोर्ट्सने प्रायोजित केलेल्या बॅटने खेळताना दिसला. प्राइम स्पोर्ट्स हे धोनीचा मित्र परमजीत सिंगच्या दुकानाचे नाव आहे.

हेही वाचा – आरबीआयच्या ‘मोठ्या’ घोषणेनंतर, शेअर बाजार कोसळला…!

2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा धोनी आता 42 वर्षांचा झाला असून तो आता आयपीएलमध्येच चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. त्याचे वय लक्षात घेता, खेळाडू म्हणून ही त्याची शेवटची स्पर्धा असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment