ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर मनू भाकर म्हणाली, “मी भगवद्‌गीता वाचली, त्यामुळे मला…”

WhatsApp Group

Manu Bhaker : मनू भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकून भारताचा 12 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवला. त्यानंततर मनूने सरबज्योत सिंगसह कांस्यपदक पटकावलं. स्वतंत्र भारतात मनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली खेळाडू ठरली. मनूचा गेल्या ऑलिम्पिकपासून पॅरिसपर्यंतचा प्रवासही सोपा नव्हता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनुच्या पिस्तुलाने घात केला होता.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक गमावल्यामुळे ती दीर्घकाळ नैराश्यात गेली होती. अगदी घरी शूटिंग सोडल्याची चर्चा होती. त्यानंतर मनूने भगवद्‌गीता वाचताना मन एकाग्र केले आणि योगाद्वारे तणाव दूर केला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक जिंकल्यानंतर मनू भाकर म्हणाली, ”माझा विश्वास आहे की आपण सर्वांनी काही परिस्थिती विसरल्या पाहिजेत, विशेषत: जेव्हा गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण इतिहास बदलू शकत नाही. आधी जे झालं ते चांगलं नव्हतं, पण आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग मला शोधायचा होता.”

124 वर्षाचा इतिहास बदलला…! मनू भाकरने जिंकलं दुसरं ऑलिम्पिक मेडल, सरबज्योत सिंग चमकला!

पदक जिंकल्यानंतर मनू म्हणाली, ”मी भगवद्गीतेचे पठण करते, त्यामुळे ‘तुम्ही इथे जे करायला आलात तेच करा’, हेच माझ्या मनात चालले होते. तुम्ही नशिबावर नियंत्रण ठेवू शकत नाही. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतात, ‘तुझे काम कर, परिणामाची चिंता करू नकोस.’ हेच माझ्या मनात चालले होते.”

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment