ब्रेकिंग : ‘जायंट किलर’ अफगाणिस्तान वर्ल्डकप 2023 मधून बाहेर

WhatsApp Group

World Cup 2023 : अफगाणिस्तान संघ 2023 च्या विश्वचषकातून बाहेर पडणारा पाचवा संघ ठरला आहे. अहमगाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली इनिंग खेळल्यानंतर अफगाणिस्तान वर्ल्डकपबाहेर झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा नेट रनरेट रन रेट -0.338 आहे, तर न्यूझीलंडचा 0.743 आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला नेट रनरेटच्या बाबतीत न्यूझीलंडच्या पुढे जाण्यासाठी 434 धावांनी सामना जिंकणे आवश्यक होते, परंतु संघ प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला केवळ 244 धावा करता आल्या.

न्यूझीलंडचे 9 सामन्यांत 10 गुण आहेत, तर अफगाणिस्तानचे 8 सामन्यांतून 8 गुण आहेत. जर अफगाणिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाची नोंद केली, तर त्याचे 9 सामन्यांत 10 गुण होतील, परंतु नेट रनरेटमुळे त्यांना गुणतालिकेत टॉप-4 मध्ये स्थान मिळवता येणार नाही. आतापर्यंत भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर न्यूझीलंडचेही सेमीफायनल खेळणे निश्चित आहे. पाकिस्तानचा नेट रन रेटही खूपच खराब आहे.

हेही वाचा – ‘पाकिस्तान झिंदाभाग’ नंतर वीरेंद्र सेहवागची अजून एक झणझणीत पोस्ट!

अफगाणिस्तानची जबरदस्त कामगिरी

अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीतही मजल मारता आली नाही. पण 2023 चा विश्वचषक त्याच्यासाठी संस्मरणीय ठरला. त्यांनी 3 माजी चॅम्पियन संघ इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तानचा पराभव केला. या तिन्ही संघांना उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. अफगाणिस्तानने 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही पात्रता मिळवली आहे. पाकिस्तानसह टॉप-8 संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्थान मिळेल. या स्पर्धेचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment