

Rashid Khan To Donate World Cup 2023 Match Fees : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्टार लेगस्पिनर राशिद खान सध्या भारतात एकदिवसीय विश्वचषक खेळत आहे. अफगाणिस्तान संघाला पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. 2000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. राशिदला या दुःखद बातमीची माहिती मिळताच त्याने मोठे मन दाखवून भूकंपग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. देशवासीयांच्या मदतीसाठी राशिदने सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे.
राशिदने (Rashid Khan News In Marathi) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील प्रांत हेरात, फराह आणि बादघिसमध्ये भूकंपाच्या दुःखद परिणामांबद्दल जाणून घेतल्याने मला खूप दुःख झाले. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी मी माझी संपूर्ण एकदिवसीय विश्वचषक 2023 सामन्याची फी दान करत आहे. आम्ही लवकरच निधी उभारणी मोहीम सुरू करणार आहोत. जे गरजू लोकांना मदत करण्यासाठी आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान
अफगाणिस्तानचा संघ विश्वचषकातील पहिला सामना बांगलादेशकडून पराभूत झाला आहे. धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला होता. आता 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला यजमान भारताचा सामना करावा लागणार आहे. भारताला घरच्या मैदानावर पराभूत करणे हे अफगाणिस्तान संघासाठी कठीण आव्हान आहे.
हेही वाचा – अरे देवा…! पंजाबच्या ‘त्या’ घरात 3 मुलांसह 6 जणांचा मृत्यू, आजी बचावली!
दशकांतील सर्वात प्राणघातक भूकंपांपैकी एक
गेल्या दोन दशकांत अफगाणिस्तानात आलेला हा सर्वात प्राणघातक भूकंप होता. देशाच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने सांगितले होते की, शनिवारी पश्चिम अफगाणिस्तानमध्ये 6.3 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप आणि त्यानंतर आलेल्या जोरदार धक्क्यांनी डझनभर लोकांचा बळी घेतला.