भारतातील स्टेडियम बघून अफगाणिस्तानचा संघ म्हणाला, ‘‘इथे पुन्हा कधीच येणार नाही….”

WhatsApp Group

Afghanistan Team On Greater Noida’s Stadium : अफगाणिस्तान क्रिकेट संघ सध्या भारतात आहे आणि न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील हा कसोटी सामना 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक स्टेडियमवर खेळवला जात आहे. मात्र सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा परिणाम दिसून आला आणि ओल्या आउटफिल्डमुळे खेळ सुरू होऊ शकला नाही. सामन्याचा पहिला दिवस एकही चेंडू न टाकता वाहून गेला. दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी स्टेडियममधील गैरसोयींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – विसरू नका, फक्त 6 दिवस उरलेत! डेडलाइन गेली तर, फ्रीमध्ये होणार नाही ‘हे’ काम

अफगाणिस्तान संघ आपले घरचे सामने फक्त भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये खेळतो. हा संघ भारतातील ग्रेटर नोएडा, लखनऊ आणि डेहराडूनमधील 3 ठिकाणी घरचे सामने खेळतो. एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांचा संघ या स्टेडियमच्या व्यवस्थेवर अजिबात खूश नाही आणि ते पुन्हा या स्टेडियममध्ये येणार नाहीत. त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानचे खेळाडू येथे जेवणापासून प्रशिक्षण सुविधांपर्यंत कोणत्याही गोष्टीवर खूश नाहीत.

त्यांनी नाराजी व्यक्त करत या स्टेडियममध्ये पुन्हा खेळायला येणार नसल्याचे सांगितले. एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘शहीद विजय सिंह पथिक स्टेडियममध्ये कोणत्याही सुविधा नाहीत, आम्ही येथे पुन्हा कधीच येणार नाही, लखनऊला आमचे प्राधान्य असेल.’ या अधिकाऱ्याने सांगितले की, येथे मूलभूत सुविधा नाहीत. हे पूर्णपणे अव्यवस्थित ठिकाण आहे.

अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीनेही चांगले ठिकाण मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. चांगले ठिकाण सापडले की तिथेच राहू, असेही ते म्हणाले. भारत हे आमचे घर आहे, असे शाहिदीने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. जेव्हा आपण संघांचे आयोजन करतो तेव्हा इतर देश आपल्यापेक्षा जास्त क्रिकेट खेळतात.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment