Urvashi Rautela-Rishabh Pant Controversy : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यातील वाद अजून वाढत चालला आहे. पंतनं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून उर्वशीचं नाव न घेता पाठलाग सोडण्याचं आवाहन केलं होतं. आता उर्वशीनंही इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यातही तिनं पंतचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे. पंतने स्टोरीत म्हटलं होतं, ”माझा पाठलाग सोड, ताई.”
उर्वशीनं ‘असं’ दिलं उत्तर!
यावर उर्वशीनं उत्तर दिलं आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली, ”छोटू भैयानं फक्त बॅट-बॉल खेळावं. बदनामी व्हावी अशी मी मुन्नी नाही. तेही तुझ्यासाठी एका किडू डार्लिंगसह. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. RP छोटू भैया. शांत मुलीचा गैरफायदा घेऊ नका.” इतकंच नाही तर उर्वशीनं स्वतःला ‘कूगर हंटर’ (बिबट्याची शिकारी) असंही संबोधलं आहे.
Chotu bhaiyaa should play bat ball 🏏. Main koyi munni nahi hoon badnam hone with young kiddo darling tere liyee
#Rakshabandhan Mubarak ho #RPChotuBhaiyya #Cougarhunter #donttakeadvantageofasilentgirl #love #UrvashiRautela #UR1 pic.twitter.com/AA3APRFViY— URVASHI RAUTELA🇮🇳 (@UrvashiRautela) August 11, 2022
Rishabh Pant Latest Story……. He Deleted It After 7 Minutes……#RishabhPant #Pant #UrvashiRautela #WhatsApp pic.twitter.com/wMWk82n5at
— Ps Virat Kohli Fan (@ps_viratkohli18) August 10, 2022
हेही वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’ पाहून इंग्लंडचा क्रिकेटर चांगलाच संतापला; म्हणाला, “लज्जास्पद…”
गुरुवारी पंत आणि उर्वशीचं प्रकरण समोर आलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये उर्वशी एका मुलाखतीत उत्तरे दिली होती. मुलाखतीत उर्वशीनं ‘मिस्टर RP’चं नाव सांगितलं होतं आणि त्याच्यासोबतचं नातं तोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली होती. यानंतर सोशल मीडियावर असं म्हटलं गेलं, की ‘मिस्टर RP’ हा दुसरा कोणी नसून ऋषभ पंत आहे. यानंतर पंतनंही इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून उर्वशीला उत्तर दिलं होते. काही मिनिटांनंतर, पंतनं त्याची स्टोरी काढून टाकलीय. आता नेटकरी उर्वशीच्या पोस्टवर कमेंट करून दोघांची खिल्ली उडवत आहेत.
मुलाखतीत काय म्हणाली उर्वशी?
एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीनं एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, ”मी एकदा वाराणसीहून दिल्लीला शूटिंगसाठी आले होते, तेव्हा ‘मिस्टर RP’ भेटायला आले होते. तो लॉबीत वाट पाहत होता, पण मी झोपी गेले. वाराणसीत एक दिवस शूटिंग केल्यानंतर मला रात्री दिल्लीत शूटिंग करायचं होतं. मी मेकअप वगैरेमध्ये गुंतले होते. त्यानंतर शूटिंगनंतर मला झोप लागली. यात दहा तास उलटले. मिस्टर RP मला फोन करत राहिले. हे मला नंतर कळलं. माझ्या फोनवर १७ मिस्ड कॉल्स आले होते. मी त्याला म्हणाले, की तू मुंबईला येशील तेव्हा भेटू. त्यानंतर मुंबईतही आमची भेट झाली, पण तोपर्यंत गोष्टी मीडियासमोर आल्या होत्या. मात्र, त्यानंतर सर्व काही बिघडलं.
Urvashi speaking about Rishabh Pant 😅#UrvashiRautela pic.twitter.com/SXPlY85KPl
— Nisha Kashyap (@nishakashyapp) August 9, 2022
२०१८ मध्ये पंत आणि उर्वशी रौतेला रिलेशनशिपमध्ये होते, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. लंच-डेटवर दोघेही अनेकदा दिसले होते. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. मात्र, काही वेळानंतर पंतनं उर्वशीला सोशल मीडिया मेसेंजर व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्याची बातमी सोशल मीडियावर आली. मात्र, दोघांनी परस्पर संमतीनं एकमेकांना ब्लॉक केल्याचं नंतर समोर आलं. मात्र, या दोघांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.