सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : अभिषेक शर्माचे वादळ! 28 चेंडूत शतक; नावावर केला वर्ल्ड रेकॉर्ड!

WhatsApp Group

Abhishek Sharma : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबचा सलामीवीर अभिषेक शर्माने टी-20 मध्ये मोठा रेकॉर्ड केला आहे. त्याने भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या उर्विल पटेल या फलंदाजाची बरोबरी केली. अभिषेकने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत गुरुवारी मेघालयविरुद्धच्या अंतिम गट-टप्प्यात 28 चेंडूत शतक झळकावले. असा विक्रम गुजरातच्या उर्विल पटेलने याच स्पर्धेत नुकताच केला. आता अभिषेक शर्माही ऋषभ पंत आणि रोहित शर्माच्या पुढे गेला आहे.

टी-20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारे भारतीय फलंदाज

अभिषेक शर्मा – 28 चेंडू
उर्विल पटेल – 28 चेंडू
ऋषभ पंत – 32 चेंडू
रोहित शर्मा – 35 चेंडू
उर्विल पटेल – 36 चेंडू

अभिषेकची स्फोटक खेळी खळबळजनक होती, ज्याच्या बळावर पंजाबने 143 धावांचे लक्ष्य केवळ 9.3 षटकांत सात गडी बाकी असताना पूर्ण केले. अभिषेकने आपल्या डावात 11 षटकार मारले होते, याआधी, अभिषेकने सहा डावात केवळ 149 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये त्याच्या नावावर केवळ एक अर्धशतक होते. मात्र आता त्याने आपल्या झंझावाती खेळीने खळबळ उडवून दिली आहे.

हेही वाचा – PUBG खेळताना सासू ओरडली म्हणून सून घरातून पळाली, शोधून शोधून नवरा हैराण!

अभिषेकने आपल्या झंझावाती शतकात 11 षटकार ठोकले आणि सूर्यकुमार यादवचा मोठा विक्रमही मोडला. अभिषेक आता एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. शिवाय तो टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा आशियाई फलंदाज बनला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment