VIDEO : कोण म्हणतं रोहित शर्माला स्लिपमध्ये फिल्डिंग जमत नाही? हा कॅच एकदा बघाच!

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG 2nd Test) दुसऱ्या कसोटी सामन्यात जबरदस्त कॅच घेतला. विशाखापट्टणम येथे खेळल्या जात या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत तिसऱ्या विकेटच्या शोधात होता, कारण जॅक क्रॉली आणि ओली पोप वेगाने धावा करत होते. अश्विन दोन्ही फलंदाजांना अडचणीत आणत होता आणि यादरम्यान रोहित शर्माने आश्चर्यकारक झेल घेतला. चेंडू विचित्र पद्धतीने त्याच्या दिशेने आल्याने हा कॅच सुटला असे प्रथमदर्शनी वाटत होते.

चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात अश्विनने अँगलसह गोलंदाजी सुरू केली. त्याने जॅक क्रॉली आणि ऑली पोप या दोघांनाही फिरकीत अडकवण्याचा प्रयत्न केला. ऑली पोपने अश्विनविरुद्ध एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिप आणि यष्टीरक्षक यांच्यामध्ये वरच्या दिशेने जात होता. रोहित शर्माचा डावा हात चेंडूच्या दिशेने गेला आणि त्याने कॅच घेतला.

रोहित शर्मा कसोटीत बहुतेक वेळा स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करतो आणि अनेकदा जबरदस्त झेल घेतो. मात्र, चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच त्याने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर कॅच सोडला. पण पोपची कॅच घेताना रोहितने कोणतीही चूक केली नाही. ओली पोप धोकादायक दिसत होता आणि 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा काढत होता.

हेही वाचा – VIDEO : भविष्यातील ‘बडा’ खेळाडू रचिन रवींद्रची डबल सेंच्युरी!

खेळपट्टीत आपल्यासाठी फायदेशीर ठरत नाही, असे लक्षात आल्यावर अश्विनने अँगलने गोलंदाजी करणे सुरू केले आणि त्याचा फायदा त्याला झाला. आधी त्याने पोप आणि नंतर जो रूटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशाप्रकारे, इंग्लंड संघावर आता दडपण आहे, कारण त्यांच्या हातात फक्त 6 विकेट आहेत आणि इंग्लंडला विजयासाठी अजून 240 पेक्षा जास्त धावा करायच्या आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment