एकट्याने ठोकल्या 498 धावा, 86 चौकारांचा पाऊस, गुजरातला मिळाला ‘वंडर बॉय’!

WhatsApp Group

Drona Desai : क्रिकेटच्या मैदानावर दररोज अनेक चमत्कार घडतात. आता एका 18 वर्षाच्या मुलाने चमत्कार केला आहे. गुजरातच्या द्रोणा देसाईने स्थानिक क्रिकेट स्पर्धेत आपल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर 498 धावांची अप्रतिम खेळी केली. त्याच्या या खेळीने क्रीडा विश्वात एक नवी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियापासून ते बातम्यांच्या मथळ्यापर्यंत सर्वत्र त्याची चर्चा आहे.

18 वर्षीय द्रोणा देसाईने गुजरातमधील गांधीनगर येथे दिवाण बल्लूभाई कप अंडर-19 स्पर्धेदरम्यान इतिहास रचला. द्रोणाने त्याची शाळा सेंट झेवियर्ससाठी (लोयोला) जेएल इंग्लिश स्कूल विरुद्ध शिवाय क्रिकेट ग्राउंड येथे 498 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली. त्याने 320 चेंडूंचा सामना करताना 7 षटकार आणि 86 चौकार ठोकले. सेंट झेवियर्सने जेएल इंग्लिश स्कूलवर एक डाव आणि 712 धावांनी विजय नोंदवला.

हेही वाचा – देशातील सर्वात मोठ्या IPO ला सेबीचा हिरवा कंदील, पुढील महिन्यात बाजारात येणार!

कोण आहे द्रोणा देसाई?

द्रोणाने वयाच्या सातव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सचिन तेंडुलकरला तो आपला आदर्श मानतो. द्रोणाच्या वडिलांनी त्याची प्रतिभा ओळखली आणि प्रसिद्ध प्रशिक्षक जयप्रकाश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला प्रशिक्षण देण्यास मदत केली. जयप्रकाश पटेल यांनी 40 हून अधिक क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले आहे. द्रोणाने अंडर-14 स्तरावर गुजरातचे प्रतिनिधित्वही केले आहे. त्याच्या अलीकडच्या कामगिरीमुळे तो भारतीय अंडर-19 संघात स्थान मिळवण्यात यशस्वी होऊ शकतो.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment