इंडोनेशियात फुटबॉल स्टेडियममध्ये मृत्यूचं तांडव..! मॅचनंतर १७४ लोकांचा अंत; पाहा घटनेचा VIDEO

WhatsApp Group

Violence In Indonesia Football Stadium : इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यानंतर एक धक्कादायक घटना घडली. सामन्यानंतर हिंसाचार उसळला आणि चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा १७४ वर गेला आहे तर जखमींची संख्या १८० च्या वर गेली आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की पराभूत संघाचे प्रेक्षक संतप्त झाले आणि त्यांनी हल्ला केला. पोलिसांनी हल्लेखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाला.

पूर्व जावा येथील मलंग रीजन्सी येथील कंजुरुहान स्टेडियमवर इंडोनेशियन लीग BRI लीगा १ च्या फुटबॉल सामन्यानंतर शनिवारी रात्री ही घटना घडली. इंडोनेशियाचे पूर्व जावा प्रांतातील पोलीस प्रमुख निको आफिंता यांनी पत्रकारांना सांगितले की, अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यातील सामन्यानंतर पराभूत बाजूच्या समर्थकांनी मैदानातच हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांना शांत करण्यासाठी अधिकाऱ्यांना अश्रुधुराचा मारा करावा लागला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. गुदमरल्याने अनेकांचा मृत्यूही झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – Pune Chandani Chauk Bridge : ६०० किलो स्फोटकं वापरूनही पूल अर्धवट का पडला? अधिकारी म्हणाले, “कारण…”

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये मलंगमधील स्टेडियमच्या खेळपट्टीवर लोक धावताना दिसत आहेत.  फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडोनेशिया (PSSI) ने एक निवेदन जारी करून या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि खेळानंतर काय घडले याचा तपास सुरू करण्यासाठी एक टीम मलंगला रवाना झाली.

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment