धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जला आवडलाय हा 17 वर्षीय मराठी क्रिकेटर!

WhatsApp Group

IPL 2025 Ayush Mhatre : आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जला अनेकदा जुने खेळाडू आवडतात, पण हा संघ नवीन खेळाडूंवरही नजर ठेवतो. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना चेन्नई सुपर किंग्जने संधी दिली आणि आता ते मोठे खेळाडू बनले. असाच एक 17 वर्षांचा क्रिकेटर चेन्नईचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने पसंत केला आहे. या मुलामध्ये इतकं टॅलेंट आहे की चेन्नई सुपर किंग्जने त्याला आयपीएलच्या ट्रायल्ससाठी बोलावले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनाने 17 वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रेला चाचणीसाठी आमंत्रित केले आहे. या खेळाडूला रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक दरम्यानच्या काळात सीएसकेच्या परफॉर्मन्स सेंटरमध्ये बोलावण्यात आले आहे. आयुष म्हात्रे हा मुंबईचा फलंदाज असून त्याने या रणजी मोसमात पदार्पण केले आहे. म्हात्रेने आतापर्यंत प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 321 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. आयुष महाराष्ट्राविरुद्ध 176 धावांची खेळी करून चर्चेत आला होता आणि धोनीला त्याची ही खेळी आवडली होती.

हेही वाचा – जिओ, एअरटेलचा कंटाळा आलाय? भारतात येतेय एलोन मस्क यांची ‘स्टारलिंक’, जाणून घ्या कंपनीबद्दल

आयुष म्हात्रेला चेन्नई सुपर किंग्ज लिलावात खरेदी करू शकते. लिलावापूर्वी या खेळाडूची आणखी चाचणी घ्यायची आहे. वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्जचे एमडी आणि सीईओ काशी विश्वनाथन यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला एक मेल पाठवला आहे. या मेलमध्ये आयुषला रणजी ट्रॉफीनंतर मोकळ्या वेळेत चाचणीसाठी पाठवण्याची परवानगी एमसीएकडे मागितली आहे. मुंबईच्या निवड समितीलाही आयुषची प्रतिभा माहीत आहे आणि त्यामुळेच सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या संभाव्य संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. आता आयुष आयपीएल 2025 साठी चेन्नई सुपर किंग्जच्या संघात दिसेल की नाही हे पाहणे बाकी आहे.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment