रणजी क्रिकेटमध्ये 12 वर्षाच्या खेळाडूचे पदार्पण, मुंबईविरुद्ध पहिली मॅच!

WhatsApp Group

रणजी ट्रॉफीचा नवा मोसम सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेटमधील अनेक मोठी नावे मैदानात खेळत आहेत. पण सर्वात मोठी चर्चा आहे ती बिहारच्या युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Suryavanshi Ranji Trophy Debut). वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्याने प्रथम श्रेणीत पदार्पण केले. बिहारचा संघ आपल्या घरच्या मैदानावर मोईनुल हक स्टेडियमवर मुंबई विरुद्ध सामना खेळत आहे. या सामन्यात वैभवला पदार्पणाची कॅप मिळाली. प्रथम श्रेणी पदार्पणाच्या वेळी सचिन तेंडुलकर वैभवपेक्षा वयाने मोठा होता. सचिनने 15 वर्षे 232 दिवसांच्या वयात पदार्पण केले.

वैभवचे वय 12 वर्षे 284 दिवस आहे. अशाप्रकारे वैभव हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळणारा सातवा सर्वात तरुण खेळाडू ठरला. या यादीत अलिमुद्दीन पहिल्या क्रमांकावर आहे. राजपुताना विरुद्ध बडोदा सामन्यात अलिमुद्दीन खेळला होता. त्यावेळी अलीमुद्दीनचे वय अवघे 12 वर्षे 73 दिवस होते. राजपुताना विरुद्ध बडोदा सामना: हा सामना 1942-43 मध्ये खेळला गेला होता.

हेही वाचा – 2024 मध्ये नोकऱ्यांचा पाऊस, ‘या’ क्षेत्रात तरुणांना जॉबची संधी!

यानंतर एसके बोस दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एसके बोस बिहार विरुद्ध आसाम सामन्यात खेळले. त्यावेळी एसके बोस 12 वर्ष 76 दिवसांचे होते. बिहार विरुद्ध आसाम यांच्यातील हा सामना 1959-60 मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर पाकिस्तानचा आकिब जावेद तिसऱ्या क्रमांकावर आहे. आकिब जावेदने 1984-85 मध्ये पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्यावेळी आकिब जावेदचे वय 12 वर्षे 76 दिवस होते. सध्या या यादीत वैभव सूर्यवंशी यांच्या रूपाने एक नवीन नाव जोडले गेले आहे.

वैभव सूर्यवंशीचा प्रवास…

वैभव सूर्यवंशीबद्दल सांगायचे तर, या खेळाडूचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला. वैभव सूर्यवंशी हा डावखुरा फलंदाज आहे. याशिवाय तो स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजी करतो. वैभव सूर्यवंशी हा भारत ब अंडर-19 संघाकडून खेळला आहे. अलीकडेच त्याने बांगलादेशविरुद्ध अंडर-19 सामन्यात 75 धावा केल्या होत्या. वैभव बिहारकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. तसेच, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळणारा वैभव सूर्यवंशी हा सातवा सर्वात तरुण खेळाडू आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment