Video : स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक करायला गेले पोलीस, घरी पोहोचल्यावर त्याचे हात पाय कापलेले…

WhatsApp Group

Mumbai Train Stunt Viral Video : रील्स बनवण्यासाठी प्राणघातक स्टंट करणे हे काही नवीन नाही. या स्टंट्सचे परिणाम काही लोकांसाठी घातक ठरू शकतात. असा एक स्टंट मस्जिद बंदर स्टेशनवर एका तरुणाने केला होता. यात त्याचा डावा हात आणि पाय कापला गेला. आरपीएफने अलीकडेच संबंधित व्यक्तीचा शोध घेतला आणि त्याच्यासोबत घडलेली घटना पाहून त्यांना धक्का बसला.

मध्य रेल्वेने ट्विटरवर एक व्हिडीओ जारी केला असून धोकादायक स्टंट करण्याबाबत सक्त ताकीद दिली आहे. क्लिपच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी अशा कृत्यांचा धोकाही अधोरेखित केला. वडाळा येथील रहिवासी फरहत आझम शेख असे या तरुणाचे नाव असून त्याने केलेल्या स्टंट व्हिडिओमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दुसऱ्यांदा असाच स्टंट करताना त्याने आपला हात आणि पाय गमावला.

हेही वाचा –फरार-चोर विजय मल्ल्याचा लपून-छपून बिजनेस, सेबीची मोठी कारवाई

रेल्वे कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर सुरू झालेल्या तपासादरम्यान आरपीएफला त्या व्यक्तीच्या अपघाताविषयी माहिती मिळाली. या व्यक्तीविरुद्ध वडाळा आरपीएफने गुन्हा दाखल केला होता. अधिकाऱ्यांनी नागरिकांना जीवघेणे स्टंट टाळण्याचे आवाहन केले आहे आणि कोणीही असे करत असल्यास मोबाईल नंबर 9004410735 किंवा 139 वर त्वरित तक्रार करा.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment