मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ भागात जोरदार पावसाचा इशारा

WhatsApp Group

Weather Forecast Maharashtra | पश्चिम वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशातील हवामानात मोठा बदल झाला असून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. त्याचबरोबर येत्या 48 तासांत पावसाची हजेरी पुन्हा पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 48 तासांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. असाही अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके व्यवस्थित झाकून ठेवावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे.

हेही वाचा – अरेरे…! तब्बल 12 वर्षानंतर केन विल्यमसन कसोटीत रनआऊट, पाहा VIDEO

मराठवाडा आणि विदर्भात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली असून त्यामुळे रब्बी पिके तसेच बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. शासनाने लवकरात लवकर नुकसानीची पाहणी करून मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

येत्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

पुण्यासह मुंबई, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment