‘रोड हिप्नॉसिस’मुळं विनायक मेटेंचा अपघात? फार भयंकर आहे हा प्रकार; एकदा वाचाच!

WhatsApp Group

Road or Highway Hypnosis : महाराष्ट्रानं विनायक मेटेंना गमावलं. शिवसंग्रामंचे नेते असलेल्या मेटेंचा मुंबई-पुणे महामार्गावर कार अपघातात निधन झालं. एका ट्रकनं मेटेंच्या गाडीला कट मारला आणि मेटेंची गाडी ट्रकला धडकली. या मोठ्या घटनेनंतर हा अपघात कसा झाला, हाच प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे. मेटेंचा गाडीचा ड्रायव्हर थकला होता का, त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं का, तो झोपेत होता का? असे प्रश्न सर्वांच्या मनात आले. पण त्याही पलिकडे रोड हिप्नॉसिसची (Road Hypnosis) चर्चा सुरू झाली आहे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात भीषण अपघात होत आहेत, त्यात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. हे अपघात इतके भयंकर आहेत की, काही क्षणात जीव जातो. लखीमपूर खेरी येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिनेश दुआ यांच्या मते बहुतांश रस्ते अपघातांमध्ये रोड हिप्नॉसिस (Road Hypnosis) हेही एक मोठं कारण असतं. काय आहे हे रोड हिप्नॉसिस?

हेही वाचा – “ट्रकनं कट मारला आणि…” नेमका कसा झाला विनायक मेटेंच्या कारचा अपघात?

रोड हिप्नॉसिसमध्ये अपघात कसे होतात?

दुआ सांगतात, ”कोणतंही वाहन चालवताना ही शारीरिक स्थिती असते. साधारणपणे अडीच ते तीन तास सतत ड्रायव्हिंग केल्यावर रस्त्याचं संमोहन (Hypnosis) सुरू होतं. अशा संमोहन अवस्थेत डोळे उघडे असतात, पण मन निष्क्रिय होतं. त्यामुळं जे दिसतं त्याचं नीट विश्लेषण केले जात नाही आणि परिणामी अपघात होतो. या संमोहन अवस्थेत अपघातानंतर १५ मिनिटें चालकाला ना समोरच्या वाहनांचं भान राहते ना त्याच्या वेगाचं आणि जेव्हा १२०-१४० च्या वेगाने टक्कर होते तेव्हा भयानक दुष्परिणाम होतात.”

रोड हिप्नॉसिस कसं टाळावं?

”संमोहनाची ही अवस्था टाळण्यासाठी दर अडीच-तीन तासांनी गाडी चालवल्यानंतर थांबलं पाहिजे. चहा-कॉफी प्या, ५-१० मिनिटे विश्रांती घ्या आणि मन शांत करा. वाहन चालवताना विशिष्ट ठिकाण आणि वाहनं ये-जा करताना लक्षात ठेवलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला शेवटच्या १५ मिनिटांपासून काहीही आठवत नाही, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःला आणि सहप्रवासींना मृत्यूच्या वाटेवर नेत आहात”, असं डॉ. दिनेश दुआ सांगतात.

हेही वाचा – VIDEO : काय तो रस्ता, काय ते संगीत, संगळं कसं ओक्केमध्ये! ‘असा’ म्यूझिकल रोड पाहिलाय का?

रोड हिप्नॉसिस अनेकदा रात्रीच्या वेळी अचानक होतं. जेव्हा इतर प्रवासी झोपलेले असतात. त्यामुळं फार मोठा अपघात होऊ शकतो. चालकाला डुलकी लागली किंवा झोप लागली तर अपघात कोणीही थांबवू शकत नाही. पण डोळे उघडे असतील तरीही मन सक्रिय असणं खूप गरजेचं आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment