Video : पुण्याच्या इमारतीला भीषण आग..! क्रिकेटर झहीर खानचं ‘असं’ कनेक्शन

WhatsApp Group

Pune Building Fire : पुण्यातील लुल्ला नगर चौकातील मार्वल व्हिस्टा इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर माजी क्रिकेटपटू झहीर खानचे रेस्टॉरंट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही ही सुदैवाची बाब आहे.

पुणे शहरातील लुल्ला नगर भागातील मार्वल व्हिस्टा इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. मार्वल व्हिस्टा येथील सातव्या मजल्यावरील व्हेजिटा रेस्टॉरंटमध्ये ही आग लागली. सकाळी ८.१५ च्या सुमारास आग लागली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

हेही वाचा – Twitter च्या सुधारणेसाठी भारताच्या ‘श्रीराम’ची मदत घेणार एलोन मस्क!

अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे कारण शोधले जात आहे. आगीमुळे रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment