मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ६८ वर्षीय मिथिलेश चतुर्वेदी यांच्यावर लखनऊमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना उपचारासाठी गावी हलवण्यात आले होते. मिथिलेश यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी ही माहिती दिली.
मिथिलेश चतुर्वेदींसोबत ‘क्रेझी 4’ आणि ‘कोई मिल गया’मध्ये काम केलेले दिग्दर्शक जयदीप सेन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले, ”मिथिलेशजींसोबत माझं खूप जवळचं नातं होतं. मला त्याच्यासोबत ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रेझी 4’ मध्ये काम करण्याचे सौभाग्य मिळालं. ‘क्रेझी 4’ हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. जेव्हा आपण एखाद्याला इतक्या जवळ ओळखता तेव्हा खूप त्रास होतो. अशी चांगली माणसे जग सोडून जातात तेव्हा खूप त्रास होतो.”
https://www.facebook.com/ashish.chaturvedi.9843/posts/5267224520037842
‘कोई मिल गया’मध्ये ‘असं’ मिळालं काम!
‘कोई मिल गया’ चित्रपटामध्ये मिथिलेश यांना कसं कास्ट केलं गेलं, याचा खुलासा जयदीप सेन यांनी केला. ते म्हणाले, “कोई मिल गयामध्ये मिथिलेश चतुर्वेदींची कास्टिंग अतिशय मनोरंजक पद्धतीने झाली होती. राकेश रोशन यांनी ‘फिजा’ पाहिला होता. त्या चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये करिश्मा कपूर मिथिलेश यांच्या तोंडावर पाणी फेकते. ते दृश्य पाहून राकेशजींना तो अभिनेता खूप आवडला. या चित्रपटासाठी राकेशजींनी आणखी एका अभिनेते रवी झकड यांना बोलावले होते. पण करिश्मा कपूरनं चित्रपटात पाणी फेकणारा अभिनेता कोण असा प्रश्न त्याला विचारला. मग झकडजींनी सांगितलं, की त्यांचं नाव मिथिलेश चतुर्वेदी आहे आणि मग आम्ही दोन्ही कलाकारांना ‘कोई मिल गया’ मध्ये साइन केले.”
Veteran actor Mithilesh Chaturvedi passes away, filmmaker Hansal Mehta confirms the demise
Read @ANI Story | https://t.co/sRmyNVI8a5#ManishChaturvedi #ManishChaturvediDied pic.twitter.com/TcNyXI4Wxu
— ANI Digital (@ani_digital) August 4, 2022
हेही वाचा – कार्तिक तुफान फॉर्ममध्ये असतानाही धोनीनं ‘ती’ चाल खेळली आणि रोहित शर्मा ओपनर बनला!
कारकीर्द!
मिथिलेश चतुर्वेदी यांनी १९९७मध्ये ‘भाई भाई’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ते ‘सत्या’, ‘ताल’, ‘फिजा’, ‘रोड’, ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘गांधी माय फादर’ सारख्या अनेक चित्रपटांचा भाग होते. या चित्रपटांमध्ये साकारलेल्या वेगवेगळ्या पात्रांमुळे मिथिलेश यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. २०२०मध्ये ते ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमध्ये दिसले होते. मिथिलेश सध्या बनछडा नावाच्या चित्रपटात काम करत होते.
मिथिलेश यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सलमान खान, शाहरुख खान आणि हृतिक रोशनसोबत अनेक मोठ्या आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.