Schemes For Pardhi Community : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रासह २० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.
जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सन २०२४-२०२५ करिता जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यासाठी अनुदान उपलब्ध झाले आहे.
हेही वाचा – पहिला ‘थ्रो’ मानाचा..! नीरज चोप्रा फायनलमध्ये, सुवर्णपदक एक पाऊल दूर
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई कस्तुरबा क्रॉस रोड न. २, कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्र. 2 सभागृह हॉल, तळमजला, बोरिवली पूर्व, मुंबई या पत्त्यावर अर्ज करावेत, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!