Uddhav Thackeray Not Allowed To Meet Sanjay Raut : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना भेटण्यासाठी मुंबईतील आर्थर रोड जेलमधून परवानगी मागितली होती. परवानगी मागितली असता, संजय राऊत यांना जेलरच्या खोलीत भेटायचे असल्याचं सांगण्यात आलं. कारागृह प्रशासनानं उद्धव ठाकरेंची परवानगी नाकारली आहे. तुरुंग प्राधिकरणानं सांगितलं की, तुम्हाला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल आणि जेलरच्या खोलीत बैठक अजिबात होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे सामान्य कैदी जसे भेटतात, त्याच प्रकारे त्यांना भेटावं लागेल, परंतु त्यासाठी देखील न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे.
परवानगी नाही!
उद्धव ठाकरेंनी कोणताही लेखी अर्ज दिला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यांना उद्धव ठाकरेंच्या वतीने कोणीतरी फोन करून सांगितलं की, उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांना SP यांच्या कार्यालयात भेटायचं आहे, त्यानंतर तुरुंग अधीक्षक म्हणाले की, त्यांना भेटायचे असेल तर लोक सर्व कैद्यांना भेटतात तिथं भेटावं लागेल. त्यासाठी न्यायालयाचीही परवानगी घ्यावी लागेल. तुरुंग अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरें-संजय राऊत यांच्या भेटीवर पूर्णविराम दिला आहे.
हेही वाचा – मोदी सरकारकडून ऐतिहासिक ‘राजपथ’चं बारसं..! इंग्रजांच्या सावलीतून बाहेर पडतोय भारत
Arthur jail authority denies permission to Uddhav Thackeray to meet Sanjay Raut
Read @ANI Story | https://t.co/bSZeqmBiJR#uddhavthackarey #SanjayRaut #ArthurJail #Maharashtra pic.twitter.com/fTsMA94DDF
— ANI Digital (@ani_digital) September 7, 2022
सूत्रांनी सांगितलं की, उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहाय्यकानं तुरुंग प्रशासनाला अनौपचारिकपणे फोन करून संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंच्या तुरुंगातील जेलरच्या केबिनमध्ये भेटण्याची परवानगी मागितली होती. उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांची भेट घ्यायची असेल, तर त्यांना न्यायालयाची अधिकृत परवानगी घ्यावी लागेल, असं तुरुंग प्रशासनानं त्यांना प्रत्युत्तरात सांगितलं.
फक्त रक्ताचं नातं असलेल्यांनाच…
जेल प्रशासनानं सांगितलं की, जेल मॅन्युअलनुसार फक्त रक्ताचं नातं असलेल्या व्यक्तीलाच दुसऱ्याला भेटण्याची परवानगी दिली जाऊ शकते, त्यानंतर त्याला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. उद्धव ठाकरे आता पुढच्या तारखेला संजय राऊत यांना भेटण्यासाठी न्यायालयात जाऊ शकतात किंवा लवकरच न्यायालयात अर्ज करून त्यांना अधिकृतपणे भेटण्याची परवानगी घेऊ शकतात, असे उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
हेही वाचा – डाय करूनही केस पांढरेच राहिल्यामुळं महिलेनं ब्युटी पार्लरवाल्याला झोडलं..! VIDEO व्हायरल
राऊतांच्या कोठडीत वाढ
पत्रा चाळशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयानं १४ दिवसांची वाढ केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. पत्रा चाळच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊतांना १ ऑगस्ट रोजी अटक केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं, की त्यांनी अद्याप जामीन अर्ज दाखल केलेला नाही.