धक्कादायक..! टीव्ही अभिनेत्याचा मृत्यू; व्यायाम करताना आला हार्ट अटॅक!

WhatsApp Group

TV actor Siddhant Veer Suryavanshi Dies : टेलिव्हिजन जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीने या जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, व्यायाम करताना सिद्धांतचा मृत्यू झाला. तो ४६ वर्षांचा होता आणि इंडस्ट्रीत चांगले काम करत होता. सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे आकस्मिक निधन ही टीव्ही जगतासाठी धक्कादायक बातमी आहे. ते या इंडस्ट्रीशी दीर्घकाळ निगडीत होते आणि अनेक कलाकारांशी त्यांचे चांगले संबंध होते.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धांत सकाळी वर्कआउट करत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर सिद्धांतला रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांच्या पथकाने सुमारे ४५ मिनिटे सिद्धांतवर उपचार केले. मात्र त्याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. तो १५ डिसेंबरला त्याचा ४७वा वाढदिवस साजरा करणार होता.

हेही वाचा – ब्रेकिंग न्यूज..! राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक

या मालिकांमध्ये काम

सिद्धांत वीर सूर्यवंशी हा एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता होता पण त्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. मॉडेलिंगमध्ये भरपूर काम केल्यानंतर त्याने टीव्हीमध्ये पाऊल ठेवले. त्याची पहिली टीव्ही मालिका ‘कुसुम’ होती. यानंतर सिद्धांत अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये होता, ज्यामध्ये तो ‘कसौटी जिंदगी की’, ‘कृष्णा अर्जुन’, ‘क्या दिल में है’ सारख्या मालिकांमध्ये दिसला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment