बॉम्बे हाय कोर्टाचा पतंजली आयुर्वेद लिमिटेडला 4 कोटी रुपयांचा दंड!

WhatsApp Group

Patanjali : सध्या बाबा रामदेव यांना कोर्टाचा धक्का बसला आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली यांना फटकारले होते आणि आता मुंबई उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडला अवमान प्रकरणात मोठा दंड ठोठावला आहे. 2023 च्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडला 4 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने सांगितले की, पतंजलीने ‘जाणूनबुजून’ न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा पतंजलीच्या मार्केट लिस्टेड कंपनी पतंजली फूड्स लिमिटेडच्या शेअर्सवर कोणताही विशेष परिणाम दिसून आलेला नाही. वृत्त लिहिपर्यंत कंपनीचे शेअर्स 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 1,694.35 रुपयांवर व्यवहार करत होते.

मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेली ट्रेडमार्क उल्लंघन याचिका निकाली काढताना न्यायालयाने पतंजलीविरोधात ही कारवाई केली. उच्च न्यायालयाने पतंजलीला दोन आठवड्यात चार कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने कंपनीला 50 लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा – देशातील मोठी दुर्घटना! केरळमध्ये भूस्खलन, शेकडो लोक अडकले, 24 जणांचा मृत्यू

कापूर उत्पादने विकण्यावर बंदी

मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेल्या ‘ट्रेडमार्क’ उल्लंघन प्रकरणात न्यायालयाने पतंजलीच्या कापूर उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली होती. मंगलम ऑरगॅनिक्सने नंतर अर्ज दाखल केला आणि असा दावा केला की पतंजली अंतरिम आदेशाचे उल्लंघन करून कापूर उत्पादने विकत आहे आणि त्यामुळे कंपनीवर अवमानाची कारवाई करण्यात यावी.

जाणूनबुजून उल्लंघन

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, पतंजलीचा न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा हेतू आहे यात शंका नाही. मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना खंडपीठाने सांगितले की, पतंजलीला दंडाची रक्कम दोन आठवड्यांच्या आत जमा करावी लागेल.

पतंजली आयुर्वेद लिमिटेड ही देशातील एक प्रसिद्ध कंपनी आहे. ते आयुर्वेदिक उत्पादनांचे उत्पादन आणि विक्री करते. कंपनीची स्थापना योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी केली होती. पतंजली आयुर्वेदाने अल्पावधीतच भारतीय बाजारपेठेत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment