मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन..! ड्रोनच्या वापरावर बंदी; अलर्ट जारी!

WhatsApp Group

Terrorist Attack Alert In Mumbai : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ड्रोन आणि छोट्या विमानांच्या मदतीने दहशतवादी मुंबईत दहशतवादी हल्ले करू शकतात. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलीस सतर्क झाले असून पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, दहशतवादी हल्ल्यात व्हीव्हीआयपींनाही लक्ष्य केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत पोलिसांनी व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

हा आदेश १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत लागू

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांनी निर्देश जारी केले आहेत की दहशतवादी आणि देशद्रोही घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडरचा वापर करून हल्ला करू शकतात. व्हीव्हीआयपींना लक्ष्य करण्यासाठी दहशतवादी या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. सुरक्षेच्या दृष्टीने पुढील ३० दिवस खाजगी हेलिकॉप्टर ते हॉट एअर बलून या सर्व गोष्टींच्या वापरावर पूर्ण बंदी असेल. केवळ मुंबई पोलीसच हवाई पाळत ठेवू शकतात. हा आदेश १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. या नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

हेही वाचा – “महाराष्ट्रात नवे सरकार..”, जेलमधून बाहेर येताच संजय राऊतांचे बदलले सूर!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment