TATA च्या ‘या’ इलेक्ट्रिक गाडीला लागली आग..! पुण्यातील घटना; Video व्हायरल

WhatsApp Group

TATA Nexon EV Caught Fire : टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहन विभागातील आघाडीचा ब्रँड म्हणून उदयास आला आहे. अलीकडेच, कंपनीने बाजारात तिची सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक SUV Nexon EV चे नवीन डार्क एडिशन लाँच केले. पण या गाडीबाबत चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 16 एप्रिल रोजी पुण्यात Nexon EV ला अचानक आग लागली आणि कारमध्ये बसलेले लोक जीव मुठीत घेऊन पळाले.

इंस्टाग्रामवर या घटनेचा एक व्हिडिओ देखील अपलोड करण्यात आला आहे, ज्यामध्ये नेक्सॉन ईव्हीचे बॉनेट उघडे असून घटनास्थळी उपस्थित लोक आग विझवत असल्याचे दिसून येत आहे. ही घटना महाराष्ट्रातील पुण्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकृत वाहन पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, हे Nexon EV XZ+ मॉडेल आहे आणि हे वाहन पुण्यात नोंदणीकृत आहे, ज्याची नोंदणी गेल्या वर्षी जुलै महिन्यात झाली होती. म्हणजे कार एक वर्षापेक्षा कमी जुनी आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुण्यातील कात्रज चौकातील रिलायन्स मार्टसमोर ही घटना घडली.

हेही वाचा – Business Idea : 70 हजारात सुरू करा हा बिजनेस.! होईल तगडी कमाई

कशी आहे ही इलेक्ट्रिक एसयूव्ही?

Tata Nexon EV Max मध्ये, कंपनीने 40.5 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे जो Nexon EV Prime 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरीसह येतो. हे बॅटरी पॅक अनुक्रमे 437 किमी आणि 375 किमीची रेंज देतात. Tata Nexon EV EV Max ची इलेक्ट्रिक मोटर 141.04 Bhp पॉवर जनरेट करते आणि EV Prime ची मोटर 127.0 Bhp पॉवर जनरेट करते. प्राइमची बॅटरी 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होते आणि मॅक्सची बॅटरी केवळ 56 सेकंदात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, नेक्सॉन इलेक्ट्रिक सनरूफ, मल्टी मोड रिजन, ज्वेल कंट्रोल नॉब, व्हेंटिलेटेड सीट्स, क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस मोबाइल चार्जर, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्येbसात-इंच TFT डिस्प्ले, सात-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सिस्टीम, ऑटो एसी, ऑटो हेडलाइट्स आणि स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे. Tata Nexon EV EV Max ची एक्स-शोरूम किंमत 16.49 लाख ते 19.54 लाख रुपये आहे तर EV प्राइमची किंमत 14.49 लाख ते 17.19 लाख रुपये आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment