ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना ‘व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

WhatsApp Group

Shivaji Satam V. Shantaram Jivangaurav Purskar : मनोरंजन सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अभिनेते शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार तर अभिनेत्री आशा पारेख यांना स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना जाहीर झाला आहे. जेष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन. चंद्रा यांना स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार दिला जाईल. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.

मुनगंटीवार म्हणाले, ”या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचं हार्दिक अभिनंदन. राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य आणि उदंड यश द्यावं.”

हेही वाचा – ‘इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया’, कंगना रणौतच्या ‘Emergency’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा

शिवाजी साटम हे एक भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेते आहेत, जे टीव्ही मालिका C.I.D मध्ये ACP प्रद्युम्न यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म 21 एप्रिल 1950 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. शिवाजी साटम अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये दिसले आहेत. त्यांनी रिश्ते नाते (1980) या मालिकेद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले आणि 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या पेस्टोनजी चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, सुवर्ण पुरस्कार आणि इतर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment