भारी बातमी..! पुण्यात शिकलेला माणूस ‘स्टारबक्स’ कंपनीचा CEO झालाय; नक्की वाचा!

WhatsApp Group

Starbucks New CEO : ग्लोबल कॉफी चेन स्टारबक्सनं (Starbucks) भारतीय वंशाच्या लक्ष्मण नरसिंहन यांना पुढील मुख्य कार्यकारी कार्यालय (CEO) म्हणून नियुक्त केलं आहे. नरसिंहन सध्या आरोग्य आणि स्वच्छता कंपनी रेकिटचे (Reckitt) प्रमुख आहेत. ते ऑक्टोबरमध्ये स्टारबक्समध्ये सामील होतील आणि एप्रिलमध्ये कंपनीचे अंतरिम सीईओ हॉवर्ड शल्ट्झ यांच्याकडून पदभार स्वीकारतील. नरसिंहन हे भारतीय वंशाच्या सीईओंच्या यादीत सामील झाले आहेत जे अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीचं प्रमुख आहेत.

या जागतिक कंपन्यांमध्ये भारतीय सीईओ

या यादीत मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गूगलचे सुंदर पिचाई, अॅडोबचे शंतनू नारायण, डेलॉइटचे पुनीत रंजन आणि फेडएक्सचे राज सुब्रमण्यम यांचा समावेश आहे. याआधी इंद्रा नूयी या पेप्सिको आणि अजय बंगा मास्टरकार्डसारख्या दिग्गज कंपन्यांच्या सीईओ होते. स्टारबक्सचे अध्यक्ष मेलोडी हॉबसन म्हणाले, की कंपनीचा विश्वास आहे की आमच्या पुढील सीईओमध्ये एक असाधारण व्यक्ती आहे. नरसिंहन यांनी व्यावसायिक जगतात अनेक महत्त्वाची कामं करून खूप नाव कमावलं आहे.

हेही वाचा – मुकेश अंबानींची ‘मोठी’ घोषणा! या दिवाळीपासून भारतात सुरू होणार…

नरसिंहन याचं शिक्षण..

स्टारबक्सचे पुढील सीईओ नरसिंहन यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलं आहे. आणि मग ते पाश्चिमात्य देशांकडं वळले. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील लॉडर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी जर्मन आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. यासोबतच त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या द वॉर्टन स्कूलमधून फायनान्समध्ये एमबीए केलं आहे.

मोठं पद मिळाल्यानंतर नरसिंहन काय म्हणाले?

नव्या नियुक्तीबद्दल नरसिंहन म्हणाले, ”संबंध आणि भावनांद्वारे मानवतेला पुढे नेण्याच्या स्टारबक्सच्या बांधिलकीनं कंपनीला इतरांपेक्षा वेगळं केलं आहे. हा एक जागतिक स्तरावर ओळखला जाणारा ब्रँड आहे ज्याने कॉफीवर आमची कनेक्ट करण्याची पद्धत बदलली आहे. अशा निर्णायक वेळी या प्रतिष्ठित कंपनीशी जोडलं गेल्यानं मला खूप आनंद होत आहे. कारण आगामी काळात, कंपनी भागीदार आणि ग्राहक अनुभवामध्ये गुंतवणूक आणि पुनर्वापर पाहेल, जे कंपनीला आजच्या बदलत्या मागण्या पूर्ण करण्यास आणि मजबूत भविष्यासाठी तयार करण्यास मदत करेल.”

हेही वाचा – चॉकलेटच्या गणपतीचं गरम दुधात विसर्जन केलं आणि खाल्लं..! व्हायरल VIDEO पाहून नेटकरी संतापले

५५ वर्षीय नरसिंहन यांनी पुढं म्हटलं, आहे की ते हॉवर्ड, बोर्ड आणि संपूर्ण नेतृत्व संघासोबत जवळून काम करतील. ते स्टारबक्स भागीदारांकडून ऐकतील आणि शिकतील. ते एकत्र काम करतील आणि कंपनीला वाढ आणि प्रभावाच्या पुढील अध्यायात घेऊन जातील. नरसिंहन लंडनहून Seattle, वॉशिंग्टन येथे शिफ्ट होणार आहेत आणि एप्रिलमध्ये अधिकृतपणे पदभार स्वीकारण्यापूर्वी शल्ट्झ यांच्यासोबत काम करतील.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment