मुंबईत रिक्षा चालवताना ‘ब्रेक’ मिळाला आणि राजू श्रीवास्तव पुढं कॉमेडी किंग ठरला!

WhatsApp Group

हिंदीमध्ये कॉमेडी किंग म्हटलं तर राजू श्रीवास्तवचं नाव हमखास ओठावर येतं. त्यानं नेहमीच आपल्या कॉमेडीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. राजू श्रीवास्तव या खऱ्या नावापेक्षा तो ‘गजोधर भैया’ म्हणून अधिक लोकप्रिय आहे. स्टँड अप कॉमेडीच्या माध्यमातून तो लोकांना हसवतो. अनेक टीव्ही आणि स्टेज शोमध्ये त्यानं काम केलं आहे. कॉमेडियन, टीव्ही सेलिब्रिटी असण्यासोबतच तो भाजपचा नेताही आहे.

राजू श्रीवास्तवचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी झाला. त्याचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे कवी होते. राजूच्या मनात आत्मविश्वास भरण्याचं काम वडिलांनी केलं. राजूला कवी नाही, तर विनोदी कलाकार व्हायचं होतं. गजोधर भैया ही त्याची विनोदी शैली तुमच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आणते. त्याला कॉमेडीचा बादशाह असंही म्हटलं जातं. राजूनं आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यानं खूप संघर्ष केला आहे. मुंबईत कामाच्या शोधात असताना आणि पैसे नसताना तो ऑटो चालवून आपला उदरनिर्वाह करत असे. अशीच एकदा ऑटो राईड करताना राजूला ब्रेक मिळाला.

हेही वाचा – भारीच..! २४ वर्षाच्या पोरासोबत ४२ वर्षाच्या आईनंही मिळवली सरकारी नोकरी; नक्की वाचा!

टीव्हीमधून करिअरला सुरुवात

राजूनं आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली. टी टाइम मनोरंजन या शोमध्ये तो दिसला होता. या शोमध्ये तो ब्रजेश हरजी आणि सुरेश मानन यांच्यासोबत दिसला होता. मात्र, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमधून राजूला लोकप्रियता मिळाली. राजूनं गजोधर भैया बनून सर्वांची मनं जिंकली होती. तो या शोचा विजेता नव्हता, पण त्यानं स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली होती. त्यानंतर राजूनं मागे वळून पाहिले नाही.

राजकारणातही सक्रिय

कॉमेडी शोमधील त्याच्या संघर्षाबद्दल सांगताना राजू एका मुलाखतीत म्हणाला होता, ”मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा लोक कॉमेडीयनला ग्रेट अभिनेता मानत नव्हते. त्या वेळी विनोद जॉनी वॉकरपासून सुरू होऊन आणि जॉनी लीव्हरपर्यंत संपायचा. त्यावेळी स्टँड-अप कॉमेडीला जागा नव्हती, त्यामुळं मला हवी तशी जागा मिळाली नाही. राजूची लोकप्रियता आणि प्रतिभा पाहून त्याला बिग बॉस शोमध्ये बोलावण्यात आलं. त्यानं शो जिंकला नाही, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकली. याशिवाय त्यानं राजकारणातही प्रवेश केला. राजू आधी समाजवादी पक्षात होता आणि नंतर त्यानं भाजपमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा – Rakshabandhan : ‘ही’ आहे देशातील सर्वात महागडी राखी..! किंमत ऐकली तर म्हणाल, “तिजोरीतच ठेवली पाहिजे”

राजूनं १९८८ मध्ये ‘तेजाब’ या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात राजूचा मात्र कॅमिओ होता. यानंतर तो मैंने प्यार किया, बाजीगर, मिस्टर आझाद, आम अठन्नी खरचा रुपैया, मैं प्रेम की दीवानी हूं, बॉम्बे टू गोवा या चित्रपटांमध्ये दिसला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment