विरारमध्ये गरबा खेळताना मुलाचा मृत्यू; धक्क्याने वडिलांचेही निधन!

WhatsApp Group

Virar Garba Son-Father Death : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार शहरात गरबा कार्यक्रमात नाचताना एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. विरार पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवार-रविवारच्या मध्यरात्री विरारमधील ग्लोबल सिटी कॉम्प्लेक्समध्ये गरबा कार्यक्रमात मनीष नरपाजी सोनिग्रा नाचत असताना खाली पडला.

मनीषला त्याचे वडील नरपजी सोनिग्रा (६६ वर्षीय) यांनी रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांचे वडीलही कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या संदर्भात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – क्रिकेट मॅचमध्ये धक्काबुक्की..! युसुफ पठाण, मिचेल जॉन्सन एकमेकांवर धावले; पाहा VIDEO

प्रत्येक पालकासाठी त्यांची मुले म्हणजे वृद्धापकाळाचा आधार असतो. पण त्याच आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर त्यांचा तरुण मुलगा मरण पावला असेल, तर यापेक्षा मोठे दु:ख या जगात असूच शकत नाही. अशीच ही हृदय हेलावून टाकणारी घटना महाराष्ट्रातील विरारमध्ये घडली. या घटनेने सगळेच हादरले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment