डाय करूनही केस पांढरेच राहिल्यामुळं महिलेनं ब्युटी पार्लरवाल्याला झोडलं..! VIDEO व्हायरल

WhatsApp Group

Woman Hits a Beauty Parlor Owner : केसांचा पांढरेपणा लपविण्यासाठी अनेकजण हेअर डायचा अवलंब करतात. अशा लोकांना नियमित कालावधीनंतर हेअर डायचा वापर करावा लागतो. दरम्यान, महाराष्ट्रातील सोलापूरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला ब्युटी पार्लरमध्ये चप्पलनं मारहाण करताना दिसत आहे. केस डाय करूनही केस काळे झाले नाहीत, म्हणून महिलेचा संताप अनावर झाला आहे. यानंतर संतापलेल्या महिलेनं ब्युटी पार्लरबाहेर तर गोंधळ घातलाच शिवाय ब्युटी पार्लरवाल्याला चप्पलनं मारहाणही केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महिलेचं नाव काय?

महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेनं पार्लरमधील काचही फोडली. यासंबंधी मोहम्मद साजिद सलमाननं सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. “तू केलेलं हेअर डाय निघून गेलंय, केस काळे होण्याऐवजी पांढरेच झालेत’, असं सांगत या महिलेनं पार्लरवाल्याला मारलं आहे. सोलापूरमधील आयकर भवन सोसायटीत राहणाऱ्या महिलेचं नाव वर्षा काळे असून तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – पांढरे केस नैसर्गिक पद्धतीनं काळे कसे कराल? डाय लावणं सोडा आणि ‘हे’ करा!

हेही वाचा – VIDEO : मुलीच्या कानात घुसला साप..! भीतीनं उडेल थरकाप; वाचा पुढं काय झालं!

नक्की प्रकरण काय?

सात रस्ता इथं डायमंड नावाचं हेअर सलुन आणि ब्युटी पार्लर आहे. या पार्लरमध्ये १९ ऑगस्ट रोजी वर्षा काळे यांनी हेअर कट आणि हेअर डाय केलं होतं. यासाठी ब्युटी पार्लरवाल्यानं त्यांना ५ हजार रुपये बिल घेतलं. काही दिवसानंतर आरशात पाहिलं असता महिला पांढरे केस दिसून आले. चिडलेल्या काळे यांनी ५ सप्टेंबरला पार्लर गाठलं आणि शिवीगाळ सुरू केली. पार्लरवाला दुकानाबाहेर आला आणि त्याच्या पाठीवर काळेंनी चप्पल फेकली. आम्ही नैसर्गिकरित्या आलेले पांढरे केस पुन्हा काळे करून देऊ, असं सांगूनही त्या महिलेनं आम्हाला मारलं, असा आरोप पार्लरवाल्यानं केला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment