वाईटात वाईट..! नदीच्या पुरातून काढली अंत्ययात्रा; पाहा मन हेलवणारा VIDEO

WhatsApp Group

सोलापूर शहरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोलापूरातील अक्कलकोटमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी सुरू आहे. अशात, एका व्यक्तीची अंत्ययात्रा पुराच्या पाण्यातून काढण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला पूर आला. इथं पुलाअभावी पितापूर या गावातील नूरअली साहेब अली भंडारी यांची प्रेतयात्रा चक्क पाण्यातून काढण्याची वेळ आली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वाईटात वाईट घडावं अशा प्रतिक्रिया येत आहेत.

नदीपलीकडं स्मशानभूमी..

पितापूर-आकांतळा या गावांना जोडणाऱ्या पुलाची उंची जास्त नाही. गावातील मुस्लिम समाजाची स्मशानभूमी हरणा नदीच्या पलीकडं आहे. त्यामुळं पितापूरमधील ग्रामस्थांना नदीतून वाट काढत स्मशानभूमी गाठावी लागल्याच विदारक चित्र या व्हायरल व्हिडिओतून समोर आलं आहे. त्यामुळं या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी गावातील लोकांनी प्रशासनाकडं केली आहे. ”प्रत्येक वर्षी पावसाळा आला की, हरणा नदीला पूर येतो आणि पाण्याची पातळी वाढते, त्यामुळे नदीपलीकडे जाण्यासाठी आम्हाला रिकाम्या बॅरलचा आधार घ्यावा लागतो”, असं तेथील नागरिकांचं म्हणणं आहे.

हेही वाचा – बापरे..! ट्रेनचा ‘असा’ हॉर्न वाजला की समजायचं धोका आहे; जाणून घ्या प्रत्येक हॉर्नचा अर्थ

अक्कलकोटमध्ये जोरदार पाऊस!

अक्कलकोट तालुक्यात मागील काही पाच दिवसांपासून चांगलाच पाऊस पडत आहे. या पावसामुळं तलाव, ओढे, नाल्यांना पाणी आल्यानं तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरल्यामुळं लोकांचेही हाल झाले आहेत. या पावसामुळं बोरगांव-घोळसगांवचा संपर्क तुटला होता, तर किणीवाडी पालापुर पुल पाण्याखाली गेला होता. प्रशासनानंही  नुकसानग्रस्त भाग व कुरनूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.

राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पाऊस!

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दबावामुळं अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे परिस्थिती बिकट होत आहे, तर अनेक राज्यांमध्ये पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. मुंबईत सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्यानं पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबईला नवी मुंबई, पालघर आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात १०-११ ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं महाराष्ट्रातील विदर्भातील अनेक भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील ४ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदियाच्या विविध भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

 

Leave a comment