Sanjay Raut Gets Bail : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरेंचा हुकुमी एक्का समजले जाणाऱ्या राऊतांना सत्र न्यायालयातून जामीन मिळाला आहे. मुंबईच्या पीएमएलए कोर्टाने जामीन अर्जाला परवानगी दिली आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
संजय राऊत १०२ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या वर्षी जुलैमध्ये अटक केली होती. यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांचा जामीन अर्ज अनेकवेळा फेटाळला होता. आता त्यांना दिलासा मिळाला असून ते १०२ दिवसांनी तुरुंगातून बाहेर येणार आहे.
हेही वाचा – Video : सुधा मूर्तींचं बापर्डे शाळेत जोरदार स्वागत..! सर्वांना भावला मराठी साज अन् साधेपणा
Money laundering case: Special court in Mumbai grants bail to Shiv Sena MP Sanjay Raut
— Press Trust of India (@PTI_News) November 9, 2022
पत्रा चाळ जमीन घोटाळा २००७ मध्ये सुरू झाला. हा घोटाळा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरण (MHADA), प्रवीण राऊत, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन अँड हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) यांच्या संगनमतानं झाल्याचा आरोप आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून संजय राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आले आहेत, असाही उल्लेख ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.