संरक्षण क्षेत्रातील ‘या’ शेअर्सची गरुडझेप, थेट 20 टक्क्यांपर्यंत उसळी!

WhatsApp Group

Share Market : शेअर मार्केटमध्ये आज मंगळवारी (18 जून) डिफेन्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये 6 ते 20 टक्क्यांची नेत्रदीपक वाढ दिसून आली. या शेअर्समध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL), माजगाव डॉक (Mazagon Dock), पारस डिफेन्स (Paras Defence) आणि कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard) या कंपन्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांदरम्यान झालेली घसरण वगळता काही काळ डिफेन्स शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आगामी काळात संरक्षण निर्यात वाढविण्याच्या अजेंडामुळे या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टर्ममध्ये संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारताना राजनाथ सिंह यांनी 2028-2029 पर्यंत 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची संरक्षण उपकरणे निर्यात करण्याचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. संरक्षण उत्पादन आणि सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणात आत्मनिर्भरता मिळवण्यावर सरकारच्या लक्षाचा पुनरुच्चार सिंग यांनी केला. त्यामुळे संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

हेही वाचा – Atal Pension Yojana : फक्त 210 रुपयांपासून गुंतवणूक, दरमहा 5000 रुपयांपर्यंत पेन्शन!

पारस डिफेन्समध्ये तेजी

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये 52 आठवड्यांचा नवा उच्चांक निर्माण झाला. याव्यतिरिक्त, स्टॉकमध्ये अप्पर सर्किट देखील लागू केले गेले. मोठ्या व्यवहारात कंपनीचे 7.06 लाख शेअर्स किंवा 1.8 टक्के शेअर्सची खरेदी-विक्री करण्यात आली आहे. पारस डिफेन्सचे शेअर्स सकाळी बीएसईवर 1157.25 रुपयांच्या वाढीसह उघडले. यापूर्वी 14 जून रोजी अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने (ADIA) पारस डिफेन्सचा 1.44 टक्के हिस्सा मोठ्या प्रमाणात खरेदी केला होता. मंगळवार हे सलग पाचवे ट्रेडिंग सत्र आहे जेव्हा पारस डिफेन्सचे शेअर्स वधारले आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment