Sharad Pawar Hospitalized : शरद पवार यांची प्रकृती बिघडली..! ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

WhatsApp Group

Sharad Pawar Admitted in Hospital : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस रुग्णालयात पवार या रुग्णालयात असतील. डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे पवार आता उपचार घेणार आहेत. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट होते.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवाजीराव गर्जे यांनी याबाबत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शरद पवार यांचे पुढील तीन दिवसांचे सर्वव कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. दि. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल व दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या दि. ४ व ५ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वाना मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारामध्ये गर्दी करू नये असे आवाहन करण्यात येत आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले गेले आहे.

हेही वाचा – अज्ञात व्यक्तीनं विराट कोहलीच्या रुमचा बनवला Video; अनुष्का म्हणाली, “तुझ्या बेडरूममध्ये…”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment