व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला आणि कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपनीला १ कोटींचा चुना लागला!

WhatsApp Group

Serum Institute duped for Rs 1.01 crore : कोरोनाची लस ‘कोविशील्ड’ बनवणाऱ्या कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संचालकांची एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. मोठी गोष्ट म्हणजे अदार पूनावाला असल्याचं भासवून फसवणूक करणाऱ्या भामट्यानं हे कृत्य केलं. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात SII चे संचालक फसवणुकीचे बळी ठरले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडून एक कोटी रुपये बँक खात्यात ट्रान्सफर केले. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने SII चे सीईओ अदार पूनावाला म्हणून फसवणूक केली आणि पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं.

पुणे पोलिसांनी ही माहिती दिली. ही घटना बुधवार आणि गुरुवारी घडल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अदार पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे नाव कोरोनाच्या काळात खूप लोकप्रिय झाले, कारण कंपनीनं जगातील बहुतेक भागात कोरोनाची लस वेगानं पोहोचवण्यासाठी बरंच काम केलं होतं.

हेही वाचा – जाळ अन धूर संगटच..! गणपतीच्या विसर्जनात पोलिसांचा ‘बेभान’ डान्स; पाहा VIDEO

कशी झाली फसवणूक?

या घटनेबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, फसवणूक करणाऱ्यानं कंपनीचे संचालक सतीश देशपांडे यांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला. त्यानं स्वत:ची ओळख आदर पूनावाला अशी दिली आणि सतीश देशपांडे यांची १,०१,०१,५५४ रुपयांची फसवणूक केली. सतीश हे कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. या प्रकरणी पुणे, महाराष्ट्रातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

फसवणूक कशी आढळली?

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा संदेश सीईओचा समजून चुकून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केले. पैसे हस्तांतरित केल्यानंतर सतीश देशपांडे यांच्या लक्षात आलं की, आदर पूनावाला असे मेसेज करून कधीही पैसे मागत नाही. त्यानंतर त्यांनी खातरजमा केली असता कंपनीची फसवणूक झाल्याचं समोर आलं.

हेही वाचा – VIDEO : नंदुरबारमध्ये ५० प्रवाशांसह बस उलटली; ड्रायव्हरसह १८ महिन्यांची चिमुरडी ठार!

अलीकडेच, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं होतेृं की ते त्यांच्या जागतिक भागीदार नोव्हावॅक्ससह मंकीपॉक्ससाठी एमआरएनए लस विकसित करण्याची योजना आखत आहेत. जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर, WHO ने २३ जुलै रोजी आरोग्य आणीबाणी घोषित केली. हे लक्षात घेऊन कंपनीनं मंकीपॉक्सची लस बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment