‘सी कॅडेट्स’ना राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून कौतुकाची थाप

WhatsApp Group

Maharashtra Governor Appreciates Sea Cadets : देशभक्ती आणि शिस्त यांचे प्रतीक असलेल्या सी कॅडेट कोअरच्या युवा कॅडेट्सच्या ५० जणांच्या एका चमूने शनिवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी सी कॅडेट कोअरच्या कार्याची माहिती करून घेतली व कॅडेट्सना कौतुकाची थाप दिली. सुरुवातीला सी कॅडेट कोअरचा स्थापनेपासूनच इतिहास सांगणारा माहितीपट दाखविण्यात आला.

यावेळी नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, सी कॅडेट कोअरचे भीष्म पितामह कमोडोर (एससीसी) रबी आहुजा तसेच सी कॅडेट कोअरचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – PAK Vs ENG Final : वर्ल्डकप इंग्लंडचा..? पाकिस्तानी फलंदाजांनी टेकले गुडघे; वाचा कोण किती खेळलं

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

 

Leave a comment