Air India : एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिला प्रवाशाला विंचू चावला! नक्की काय घडलं?

WhatsApp Group

Scorpion In Air India Flight : नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशाला विंचवाने चावा घेतल्याची घटना घडली आहे. 23 एप्रिल रोजी झालेल्या घटनेची पुष्टी करताना एअर इंडियाने सांगितले की, प्रवाशावर उपचार करण्यात आले असून तो आता धोक्याबाहेर आहे. नागपूर-मुंबई फ्लाइट (AI 630) मध्ये एक विंचू आढळला. या घटनेनंतर मुंबई विमानतळावर माहिती पाठवण्यात आली, त्यानंतर डॉक्टरांना उपचारासाठी सांगण्यात आले.

एएनआयच्या वृत्तानुसार, विमान उतरताच महिला प्रवाशावर तात्काळ उपचार करण्यात आले आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवासी उतरल्यावर डॉक्टर विमानतळावर पोहोचले आणि नंतर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आमच्या अधिकाऱ्यांनी महिला प्रवाशासोबत रुग्णालयात नेले आणि प्रवाशाला तिला डिस्चार्ज मिळेपर्यंत शक्य ती सर्व मदत केली. आता तो धोक्याबाहेर आहे.

हेही वाचा – IPL 2023 : वाद चिघळणार? विराट कोहलीचं BCCI ला पत्र; म्हणाला, “गंभीर, नवीनला आपण…”

विमानाची तपासणी केल्यानंतर सापडला विंचू

एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच एअर इंडियाच्या इंजिनीअरिंग टीमने विमानाची कसून तपासणी केली आणि कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. टीमने प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले आणि विमानाची कसून तपासणी केल्यानंतर विंचू सापडला. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आणि गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे एअर इंडियाने म्हटले आहे. यापूर्वीही फ्लाइटमध्ये साप आणि उंदीर येण्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment