10 वर्षाच्या मुलाने मुंबई पोलिसांची उडवली झोप! फोन करून सांगितलं, की…

WhatsApp Group

Mumbai Airport : एका 10 वर्षांच्या मुलाने मुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याचे सांगून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईपासून 250 किमी अंतरावर असलेल्या सातारा येथे राहणाऱ्या एका मुलाने पोलिसांच्या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 112 वर कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती दिली. हे कळताच मुंबई पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली, त्यानंतर हा फसवणूक कॉल म्हणून घोषित करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणार्‍याने सांगितले की, 10 तासांनंतर टेक ऑफ होणार्‍या फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे.

हे प्रकरण एका लहान मुलाशी संबंधित असल्याने पोलीस त्याच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाहीत. साधारणपणे असे हॉक्स कॉल केल्यावर पोलीस आरोपींवर गुन्हा दाखल करतात. तथापि, मुलांशी संबंधित अशा प्रकरणांमध्ये, त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाऊ शकते जेणेकरुन ते आपल्या मुलांना अशा प्रकारच्या गोष्टी करण्यापासून रोखतील. यासोबतच बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा पर्यायही पोलिसांकडे आहे.

हेही वाचा – करोडो कामगारांचे नशीब बदलणार! मोदींचा वाढदिवस ठरणार खास; जाणून घ्या!

मुंबईत हॉक्स कॉलची ही पहिलीच घटना नाही. सुमारे महिनाभरापूर्वी मुंबई पोलिसांना असाच एक फोन आला होता. 2008 मध्ये झालेल्या 26/11 बॉम्बस्फोटांच्या धर्तीवर हल्ला करणार असल्याचे सांगण्यात आले. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हॉक्स कॉल दरम्यान जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. फोन करणाऱ्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment