धक्कादायक..! महिलेला ७० सेकंदात २८ शिव्या; सोशल मीडियावर संजय राऊतांची ऑडिओ टेप?

WhatsApp Group

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. या महिलेनं मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात राऊतांविरोधात तक्रार दाखल केली असून तिच्यावर बलात्कार आणि खुनाची धमकी दिल्याचा आरोप आहे. महिलेचा दावा आहे की तिनं मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर निवेदन दिलं होतं, हे धमकीचं प्रकरण देखील त्याच प्रकरणाशी संबंधित आहे (पत्रा चाळ जमीन घोटाळा). महिलेनं १७ सेकंदांची एक ऑडिओ क्लिपही पोलिसांना सुपूर्द केली आहे ज्यामध्ये एक पुरुष महिलेला अपशब्द बोलत आहे.

संजय राऊतांचा आवाज?

महिलेनं दावा केला आहे, की ऑडिओमध्ये ऐकलेला पुरुष आवाज संजय राऊतांचा आहे तर महिला आवाज त्यांचाच आहे. पीडितेनं सांगितलं की, तिला कॉल आणि पेपरद्वारे धमकावण्यात आलं. वृत्तानुसार, या ऑडिओ क्लिपमध्ये, व्यक्तीला शिवीगाळ करताना, फोन हँग अप करताना ऐकू येत आहे. ”फोन ठेव.. तू मला शिकवशील. तू मला काय समजतेस? माझ्याशी पंगा घेऊ नकोस, मी तुला पुन्हा सांगत आहे, हे रेकॉर्ड करा आणि ठेव. याची नोंद करून पोलिसांकडे दे.”

ऑडिओ क्लीप ऐकण्यासाठी येथे क्लिक करा!

त्याचवेळी ती महिला म्हणते, ”मी तुझ्यासारखी नाही, मला तुझ्याशी बोलण्यात रस नाही.” तेव्हा समोरचा माणूस म्हणतो, ”तू काही दिवस थांब, तुझी स्थिती काय आहे? जमिनीची कागदपत्रं मला हस्तांतरित कर, एकतर सुजितच्या नावावर किंवा माझ्या नावावर कागद हस्तांतरित कर.” या संभाषणात पुरुष महिलेला खूप शिवीगाळ करत आहे.

पोलिसांकडं तक्रार!

महिलेच्या म्हणण्यानुसार, मुंबई पोलीस आणि ईडीकडं तक्रार करण्यात आली आहे. ”फोन आणि पेपर्सच्या माध्यमातून मला धमक्या आल्या आहेत. या ऑडिओमध्ये माझं आणि संजय राऊत यांच्यातील संभाषण आहे. ऑडिओमध्ये अनेक अपशब्द आहेत. अशी भाषा का वापरली जाते हे मला कळत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मला धमक्या येत आहेत. पोलिसांत तक्रार करूनही आधार मिळाला नाही”, असं त्या महिलेनं सांगितलं आहे.

हेही वाचा – लाइव्ह क्रिकेट सामन्यात बॉम्बस्फोट..! थोडक्यात बचावले ‘स्टार’ क्रिकेटपटू; VIDEO व्हायरल!

ही ऑडिओ क्लीप संजय राऊतांची आहे, असा दावा ‘वाचा मराठी’ करत नाही. या प्रकरणी संजय राऊत यांची बाजू अद्याप समजलेली नाही. मुंबई पोलीस महिलेनं केलेल्या तक्रारीचा तपास करत आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment