“जर शिवसेनेला परवानगी मिळाली नाही, तर…”, दसरा मेळाव्याच्या भांडणात संजय राऊतांची उडी!

WhatsApp Group

Sanjay Raut On Dasara Melava : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये कोण घेणार, यावरुन उद्धव ठाकरे यांचा गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट असा शिवसेनेत वाद सुरु झाला आहे. दोन्ही गटांच्या समर्थकांकडून शिवाजी पार्कात आम्हीच मेळावा घेणार असा दावा केला जात आहे. आता या वादात शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) राऊतांना अटक करण्यात आली आहे.

न्यायालयामध्ये भेटलेल्या नेत्यांसोबत संजय राऊत यांनी चर्चा करताना दसरा मेळाव्यासंदर्भात वक्तव्य केलं. “शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो ही परंपरा आहे. परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी पार्कमध्ये घुसून मेळावा घ्यावा”, असा सल्ला राऊतांनी दिला आहे. राऊतांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. ईडीनं त्यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली. आता त्यांच्या यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत राऊत कोठडीत असतील.

हेही वाचा – पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतच मास्टरमाईंड..! ईडीनं त्यांच्या ‘पगारासह’ दाखल केलं आरोपपत्र

बीकेसीमधील मैदानावर मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला एमएमआरडीनं परवानगी दिलीय. मात्र मुंबई महानगरपालिकेनं अद्याप शिवाजी पार्कसंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही. एकनाथ शिंदे आणि ४० समर्थक आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment